मुखपृष्ठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.
कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे.
सध्या यात ५५,१६१ लेख आहेत.
आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.
वाचा

Terrestrial globe.svg सर्व पाने Nuvola filesystems services.png मुखपृष्ठ सदरे
Crystal Project Gadu protocol.png उदयोन्मुख सदरे
Crystal Clear app karm.png विकिप्रकल्प Emoji u1f4f2.svg मोबाईल ?

लिहा
Crystal Clear app kedit.pngकसे लिहू

Checklist.png काय लिहू
Internet-group-chat.svg इतर काय लिहीताहेत

घडवा

Chat bubbles.svg चावडीवर चर्चा करा
Featured article star - check.svg पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा
Swiss vote.png विविध प्रस्तावांवर कौल द्या

विशेष लेखन क्रीडा वैद्यकशास्त्र वनस्पती तत्त्वज्ञान इतिहास भूगोल सूर्यमाला महाराष्ट्र शासन दालन सूची

Crystal Clear action bookmark.png विशेष लेख

Imphalgurkhas.jpg

कोहिमाची लढाई दुसर्‍या महायुद्धादरम्यान जपानी सैन्य, आझाद हिंद फौज व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये लढली गेली होती. एप्रिल ४ ते जून २२, इ.स. १९४४ दरम्यान आधुनिक भारताच्या नागालँड राज्यातील कोहिमा शहराच्या सीमेवर लढली गेलेली ही लढाई जपानच्या उ गो मोहिमेचा सर्वोच्चबिंदू होता. या लढाईची तुलना अनेकदा स्टालिनग्राडच्या वेढ्याशी करण्यात येते.

तीन टप्प्यांत लढल्या गेलेल्या या लढाईच्या सुरुवातीस एप्रिलच्या पूर्वार्धात जपानने कोहिमा रिज ही जागा जिंकून इंफाळकडे जाणारा रस्ता ताब्यात घेतला. १६-एप्रिल १८च्या दरम्यान ब्रिटिश व भारतीय सैन्यांची कुमक आडवाटेने कोहिमाला पोचली व त्यांनी जपान्यांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. या प्रतिहल्ल्यानंतर जपानी सैन्याने कोहिमा रिज सोडली पण कोहिमा-इंफाळ रस्ता त्यांच्याच ताब्यात राहिला. मेच्या मध्यापासून जून २२ पर्यंत ब्रिटिश आणि भारतीय सैन्याने हळूहळू माघार घेणार्‍या जपानी सैन्याला मागे रेटत रस्ता काबीज केला. तिकडून इंफाळकडूनही चालून आलेल्या दोस्त सैन्याशी त्यांनी मैल दगड १०९ येथे संधान बांधले व इंफाळला पडलेला वेढा मोडून काढला.

इ.स. १९४४च्या सुरुवातीस युनायटेड किंग्डमने भारतातून म्यानमार (तेव्हाचा ब्रह्मदेश) आणि तेथून आग्नेय आशियामध्ये ठाण मांडून बसलेल्या जपान्यांना हुसकावण्यासाठीची तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी ईशान्य भारतातील मिझोरम प्रदेशातील इंफाळ शहरात आपले इंडियन फोर्थ कोअर हे सैन्यदल जमवले होते. याला काटशह देण्यासाठी जपानने उ-गो मोहीम या नावाखाली प्रतिआक्रमण करण्याचे ठरवले. जपानच्या पंधराव्या सैन्यदलाच्या मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुची याने या मोहिमेला अधिक मोठे करण्याचे ठरवले. मुतागुचीच्या आराखड्याप्रमाणे जपानी सैन्य फक्त चौथ्या कोअरला अडवण्यासाठी नाही तर ब्रिटिश भारतावर आक्रमण करण्यासाठीच चालून जाणार होते. यात ईशान्य भारतातून घुसून थेट भारताच्या मध्यापर्यंत धडक मारण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही होते. दीड-दोनशे वर्षे भारतात ठाण मांडलेल्या ब्रिटिशांना असे सहजासहजी हुसकावणे शक्य नाही हा विरोधी युक्तिवाद त्याने नाकारला. प्रकरण युद्धमंत्री हिदेकी तोजोपर्यंत गेल्यावर तोजोनेही हा युक्तिवाद फेटाळून लावला व मुतागुचीला भारतावर आक्रमण करण्यास मुभा दिली.

मुतागुचीच्या व्यूहरचनेनुसार जपानच्या ३१वी डिव्हिजनने कोहिमावर हल्ला करून इंफाळला ब्रिटिश भारतापासून तोडायचे आणि मग खुद्द इंफाळवर हल्ला करीत चौथ्या कोअरला नेस्तनाबूद करीत भारतात घुसायचे ही योजना होती. ५८वी, १२४वी, १३८वी रेजिमेंट आणि ३१वा डोंगरी तोफखाना इतकी शिबंदी घेऊन ३१व्या डिव्हिजनने कोहिमा घेतल्यावर पुढे दिमापूरवर चाल करून जाणे अपेक्षित होते. दिमापूर हातात आल्यास तेथील लोहमार्ग आणि ब्रह्मपुत्रा खोर्‍यावर ताबा मिळवणे व ब्रिटिशांची रसद तोडणे हा डाव त्यात होता.

३१व्या डिव्हिजनचा मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल कोतोकू सातो या व्यूहरचनेवर नाखूष होता. या हल्ल्याच्या योजनेत त्याला सुरुवातीपासून सामील केले गेलेले नव्हते आणि त्याच्या मते जपानी सैन्याला कोहिमा पटकन जिंकणे सोपे नव्हते. आपल्या मुख्य सैन्यापासून इतक्या लांबवर चाल करून जाण्यात रसदपुरवठा कायम ठेवणे हे जिकिरीचे काम होते. सातोने आपल्या सहकार्‍यांजवळ जपानी सैन्याची उपासमार होणार असे भाकीत वर्तवले होते. इतर सेनाधिकार्‍यांप्रमाणे सातोच्या मते मुतागुचीही रेम्या डोक्याचा होता. १९३०च्या दशकात जपानी सैन्यात पडलेल्या फुटीदरम्यान सातो आणि मुतागुची परस्परविरुद्ध उभे राहिलेले होते आणि त्यामुळ सातोला मुतागुचीवर किंवा त्याच्या डावपेचांवर विश्वास नव्हता.

मार्च १५, इ.स. १९४४ रोजी जपानच्या ३१व्या डिव्हीजनने होमालिन गावाजवळ चिंदविन नदी ओलांडली व भारतावरील आक्रमणाला सुरुवात केली. अंदाजे शंभर किमी (६०मैल) रुंदीची आघाडी सांभाळत हे सैन्य म्यानमारच्या घनदाट जंगलातून वाटचाल करू लागले. डोंगराळ प्रदेश, नद्या-नाले व गर्द झाडी असलेल्या अवघड वाटेवरही जपानी सैन्य जोमाने कूच करीत होते. डाव्या आघाडीवरील ५८वी रेजिमेंट इतरांच्या पुढे होती. त्यांची गाठ ब्रिटिश भारतीय सैन्याची सर्वप्रथम इंफाळच्या उत्तरेस मार्च २०च्या सुमारास पडली.

पुढे वाचा... कोहिमाची लढाई

मागील अंक: जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक

Emoji u1f4f2.svg मोबाईल ?

मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा

Nuvola apps package graphics.png आजचे छायाचित्र

Valley of Tasman River NZ 12.jpg

Crystal Clear app khelpcenter.png थोडक्यात 'विकिपीडिया' प्रकल्पाविषयी

पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग

Crystal Project Gadu protocol.png आपण नवीन सदस्य आहात?

Nuvola apps kalarm.png दिनविशेष

ऑक्टोबर १९:

जन्म:

मृत्यू:

ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १६


अलीकडील मृत्यू: एम. करुणानिधी, स्टीफन हॉकिंग, श्रीदेवी, पी.एन. भगवती, रीमा लागू, विनोद खन्ना, गोविंद तळवलकर, किशोरी आमोणकर, गौरी लंकेश

Crystal Project Gadu protocol.png उदयोन्मुख लेख

सूर्यमालेतील ग्रह

सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र नैसर्गिक उपग्रह, ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.

सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, २ अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, ४ वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.

सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनसनेपच्यून. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआमाकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.

सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गात वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके वस्तुमान आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्तू नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनसनेपच्यून.

ऑगस्ट २४ २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये करण्यात आले. त्याच वेळी सेरेसएरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.

(पुढे वाचा...)

मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा

Icon apps query.svg आणि हे आपणास माहीत आहे का?

सबॉबा
सबॉबा


वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.

संक्षिप्त सूची

समाजशास्त्र

पुरातत्त्वशास्त्रमानवशास्त्रअर्थशास्त्रशिक्षणकायदासमाजशास्त्रराजकारणराजनीती विज्ञान

  भूगोल

भूगोलखंडदेशशहरेपर्वतसमुद्रपृथ्वीखगोलशास्त्रसूर्यमाला

कला आणि संस्कृती

नृत्यसंगीतव्यंगचित्रकाव्यशिल्पकलानाटक

विश्वास

श्रद्धाधर्महिंदू धर्मइस्लाम धर्मख्रिश्चन धर्मरोमन धर्मबौद्ध धर्मजैन धर्मज्यू धर्मसंस्कृतीनुसार दैवते

पराश्रद्धाफलज्योतिष

अश्रद्धानास्तिकता

अभियांत्रिकी

तंत्रज्ञानजैवतंत्रज्ञानअतिसूक्ष्मतंत्रज्ञानअभियांत्रिकीरासायनिक अभियांत्रिकीविमान अभियांत्रिकीअंतरीक्ष अभियांत्रिकीसंगणकसंगणक अभियांत्रिकीस्थापत्य अभियांत्रिकीविद्युत अभियांत्रिकीविजाणूशास्त्रयांत्रिकी

विज्ञान आणि आरोग्य

विज्ञानजीवशास्त्रवनस्पतीशास्त्रपशु विज्ञानआयुर्विज्ञानभौतिकशास्त्ररसायनशास्त्रजैवरसायनिकीगणितअंकगणितबीजगणितभूमितीकलनस्वास्थ्यविज्ञानरोगचिकित्साशास्त्रचिकित्सा पद्धती

भाषा आणि साहित्य

भाषाभाषा-परिवारभाषाविज्ञानमराठी भाषासाहित्यकाव्यकथा

मनोरंजन आणि क्रीडा

क्रीडाक्रिकेटफुटबॉलचित्रकथादूरचित्रवाहिनीपर्यटनपाककलाइंटरनेटरेडियोचित्रपटबॉलीवूड

व्यक्ती आणि वल्ली
व्यक्तीअभिनेतेअभिनेत्रीखेळाडूलेखकशास्त्रज्ञसंगीतकारसंशोधकगायक

इतिहास

इतिहासकालमापनसंस्कृतीदेशानुसार इतिहासयुद्धमहायुद्धेसाम्राज्ये

पर्यावरण
पर्यावरणपर्यावरणशास्त्रहवामानपश्चिम घाट

निवेदन

मराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
  • "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
  • येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
  • विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.


इतर भारत ध्वज भारतीय भाषांमधील विकिपीडीया

१०,००,०००+ : इंग्लिश  •  १,००,०००+ : तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली, नेपाळी, गुजराती
,संस्कृत, कन्नड, पंजाबी, उडिया, मैथिली  •  १,०००+ : सिंधी  •  १००+ काश्मिरी
संपूर्ण यादी

विकिपीडियाचे सहप्रकल्प

विकिपीडिया हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:
Commons-logo.svg कॉमन्स – सामायिक भांडार Wikisource-logo.svg विकिस्रोत – स्रोत कागदपत्रे Wiktionary-ico-de.png विक्शनरी – शब्दकोश
Wikibooks-logo.svg विकिबुक्स – मुक्त ग्रंथसंपदा Wikiquote-logo.svg विकिक्वोट्स – अवतरणे Wikinews-logo.svg विकिन्यूज (इंग्लिश आवृत्ती) – बातम्या
Wikispecies-logo.svg विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) – प्रजातिकोश Wikiversity-logo.svg विकिविद्यापीठ – शैक्षणिक मंच Wikimedia-logo.svg मेटा-विकि – सुसूत्रीकरण