वापरकर्त्यानी दिलेल्या प्रतिक्रिया. ०१

This is a user testing video for WordPress https://wordpress.org in Marathi. Visit https://mr.wordpress.org to download WordPress in Marathi.

वर्डप्रेस मराठी अनुवादाचे वापरकरत्यानी दिलेल्या प्रतिक्रिया. वर्डप्रेस मराठी मध्ये डाउनलोड करण्यासाठी https://mr.wordpress.org ला भेट द्या.

प्रतिक्रिया देण्यासाठी येथे भेट द्या https://mr.wordpress.org/contact

 

वर्डप्रेसच्या विश्व अनुवाद दिवसासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊया.

वर्डप्रेस पॉलीग्लॉट टीम १२ नोव्हेंबरला विश्व् अनुवाद दिवसाचे आयोजन करत आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून सर्व लोक आमंत्रित आहेत.

वर्डप्रेस अनुवाद करणे हे तुमचे योगदान देण्यासाठी एक अतिशय सोपे माध्यम आहे. तुम्हाला वर्डप्रेस बद्दल अधिक जाणून घेण्याची तसेच जग भरातल्या लोकांना भेटण्याची आणि वर्डप्रेसला १६० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची विश्व् अनुवाद दिवस एक उत्तम संधी आहे.

 

जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून १२ नोव्हेंबर ला आमच्यासोबत सामील व्हा.
अनुवाद दिवस सुरु होण्याची वेळ १२ नोव्हेंबर, २०१६ ०.० UTC आहे आणि २४ तासानंतर समारोप होईल .तुमची वेळ इथे बघा. तुम्ही सुरुवातीपासून सामील होऊ शकता अथवा संपूर्ण दिवसात जी पण वेळ तुम्हाला योग्य वाटेल.

आम्ही काय करतो आहोत ?
स्थानीक सहयोगक दिवस पूर्ण जगात होत आहेत, हा सम्मिलीत होण्याचा एक चांगला मार्ग आहे. आपल्या आजूबाजूच्या स्थानीय इव्हेंट बघण्यासाठी हा मॅप बघा. कुठलाही मिळाला नाही? आपला स्थानीक इव्हेंट आयोजित करा!

याच वेळी २४ तासातील दूरस्थ बैठकीत विविध भाषेतील थेट प्रसारणात सामील व्हा. सर्व बैठकी स्थानीयकरण, अंतर्राष्ट्रीयकरण आणि आपल्या भाषेमध्ये योगदान देण्यासाठी सामील करतील.

हे कुणाकरता आहे?
तुम्ही अनुवाद करण्यात नवीन असाल आणि अनुवाद करणे शिकायचे असेल अथवा आपण अनुभवी अनुवाद संपादक असाल जो आपला मजबूत संघ बनवतो आहे, तर अनुवाद दिवस आपल्यासाठी आहे. डेव्हलपर्स सुद्धा अनुभवी सहकाऱ्यांच्या विषयांमुळे आनंदित होतील, आपण अंतराष्ट्रीयीकरणाबद्दल शिकत असाल अथवा आपल्या थिम्स आणि प्लगिन्स साठी अनुवादक शोधत असाल .

सहभागी व्हा.
सहभागी होणं खूप सोपं आहे ! १२ नोव्हेंबर ला, आपल्या टाईमझोन मध्ये, दिवसाच्या कुठल्याही वेळी सरळ प्रसारण बघतांना, वर्डप्रेस अनुवाद करा किंवा आपल्या आवडत्या थिम अथवा प्लगीन ला आपल्या भाषेमध्ये अनुवादित करा .

जास्त लोकांना सामील व्हायचे आहे ? स्थानीय इव्हेंट आयोजिय करण्यासाठी साइनअप करा आणि आपल्या स्थानीय समुदायाला १२ नोव्हेंबर ला सोबत अनुवाद करण्यासाठी आमंत्रित करा. इव्हेंट्स औपचारिक अथवा अनौपचारिक कसेपण असू शकतात -आपले काही मित्र आणि लॅपटॉप सोबत घ्या आणि जवळच्या एखाद्या कॉफी शॉप वर जाऊन १-२ तास अनुवाद करा.

जर तुम्ही फक्त इंग्लिश बोलत असाल तर तुम्ही सहभागही होऊ शकता का ?

अवश्य, जर तुम्ही फक्त इंग्लिश बोलत असाल तरी आंतराष्ट्रीयीकरणासाठी चांगली सत्र आयोजित होत असतात जी प्रत्येक डेव्हलपरसाठी फायदायची ठरतील. इंग्लिश भाषेची सुद्धा अनेक प्रारूपे आहेत उदाहरणार्थ : ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि युनाइटेड किंग्डम मध्ये वेगवेगळी इंग्लिश बोलली आणि लिहली जाते. आपण हे मतभेद आणि याची रूपे महत्त्वाचे का आहेत या बद्दल सत्रांमध्ये जाणून घेऊ शकता.

तुम्हाला जर अजून मजा करायची असेल तर वर्डप्रेसला ईमोजी मध्ये अनुवाद करून पहा, बरोबर वाचताय मित्रहो आम्ही वर्डप्रेसला ईमोजी मध्ये अनुवाद करतोय.

प्रश्न
जर आपल्याला काही प्रश्न असतील तर टीम आणि आयोजक हॅन्गआऊट (#polyglots in Slack) वर आपल्याला आनंदाने मदत करतील.(स्लॅक वरील निमंत्रणासाठी chat.wordpress.org)

इव्हेंट मध्ये सामील होण्यासाठी अधिकृत साईट वर साइनअप करा.