डग्लस अ‍ॅडम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डग्लस अ‍ॅडम्स
Douglas adams portrait cropped.jpg
जन्म नाव डग्लस नोएल अ‍ॅडम्स
जन्म ११ मार्च, इ.स. १९५२
केंब्रिज, इंग्लंड
मृत्यू ११ मे, इ.स. २००१
सांता बार्बरा, कॅलिफोर्निया, अमेरिका
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार विज्ञान काल्पनिका, विनोदी साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती द हिचहायकर्स गाईड टू द गॅलक्सी

डग्लस नोएल अ‍ॅडम्स (इंग्लिश: Douglas Adams) (११ मार्च, इ.स. १९५२ - ११ मे, इ.स. २००१) हा ब्रिटिश लेखक व नाटककार होता. त्याची 'द हिचहायकर्स गाईड टू द गॅलक्सी' ही विज्ञान काल्पनिका प्रसिद्ध आहे. इ.स. १९७८ साली पहिल्यांदा ती बीबीसीच्या रेडिओ कार्यक्रमाच्या स्वरूपात लोकांसमोर आली. नंतर ती पाच पुस्तकांच्या मालिकेच्या रूपात प्रसिद्ध झाली. डग्लसाच्या हयातीत या पुस्तकांच्या जवळपास दीड कोटी आवृत्त्या खपल्या, त्यावर एक दूरदर्शन मालिका निर्मिली गेली, अनेक रंगमंचीय प्रयोग, कॉमिकबुके, संगणक खेळ आणि इ.स. २००५ साली एक चित्रपट बनवला गेला.

अ‍ॅडम्साने डर्क जेंटली'ज होलिस्टिक डिटेक्टिव्ह एजन्सी(इ.स. १९८७), द लॉंग डार्क टी-टाईम ऑफ द सोल (इ.स. १९८८) ही पुस्तके लिहिली आहेत. तसेच, द मीनिंग ऑफ लाईफ(इ.स. १९८३), लास्ट चान्स टू सी(इ.स. १९९०), दूरदर्शन मालिका 'डॉक्टर हू'चे तीन भाग यांसाठी सहलेखन केले. त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या उर्वरित लिखाणाचा संग्रह, द साल्मन ऑफ डाऊट या नावाने इ.स. २००२ साली प्रकाशित झाला.

बाह्य दुवे[स्रोत संपादित करा]

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.