वित्तीय स्कॅम धोरण
विहंगावलोकन
सप्टेंबर 2019
आपण Twitter च्या सेवांचा वापर माहितीचा कृत्रिमरित्या विस्तार करण्याच्या किंवा दडपून ठेवण्याच्या हेतूने करू शकत नाही किंवा Twitter वरील लोकांचा अनुभव प्रभावित करणारे किंवा व्यत्यय आणणारे वर्तन करू शकत नाही.
आम्हाला Twitter ला असे ठिकाण बनवायचे आहे जिथे लोकांना जिव्हाळ्याचे संबंध जोडता येतील आणि विश्वसनीय माहिती सापडेल. या कारणास्तव, स्कॅम तंत्रे, फिशिंग किंवा अन्यथा फसवणुकीच्या किंवा तोतयागिरीच्या पद्धती वापरून आपल्याला पैसे किंवा वैयक्तिक आर्थिक माहिती पाठविण्यासाठी इतरांची फसवणूक करण्याकरिता आपण Twitter च्या सेवा वापरू शकत नाही.
या धोरणाचे उल्लंघन काय आहे?
या धोरणांतर्गत पैसे किंवा वैयक्तिक आर्थिक माहिती मिळविण्यासाठी Twitter वर स्कॅम तंत्रे वापरणे प्रतिबंधित आहे. आपल्याला खाती तयार करण्याची, ट्विट्स पोस्ट करण्याची किंवा अशा फसवणुकीच्या योजनांत सहभागी होण्याचा आग्रह करणारे थेट संदेश पाठविण्याची परवानगी नाही. प्रतिबंध असलेल्या, फसवणुकीच्या तंत्रांमध्ये खालील घटकांचा समावेश होतो:
- नातेसंबंध/विश्वास प्रस्थापित करणारे स्कॅम्स. खोटे खाते चालवून किंवा प्रसिद्ध व्यक्ती किंवा संघटना असल्याचे भासवून आपल्याला पैसे किंवा वैयक्तिक वित्तीय माहिती पाठविण्यासाठी आपण इतरांना फसवू शकत नाही.
- मनी-फ्लिपिंग योजना. आपण “मनी फ्लिपिंग” योजनांमध्ये (उदाहरणार्थ, सुरुवातीला वायर ट्रान्सफर किंवा प्रिपेड डेबिट कार्डाने लहान रक्कम पाठविण्याच्या बदल्यात कोणाला मोठी रक्कम पाठविण्याची हमी देणे) सहभागी होऊ शकत नाही.
- फसवणुकीच्या सवलती. इतरांना सवलतीच्या ऑफर्स देणाऱ्या अशा योजना आपण चालवू शकत नाही ज्यामध्ये चोरलेली क्रेडिट कार्डे आणि/किंवा चोरलेली वित्तीय अधिकारपत्रे वापरण्यासाठी ऑफर्सची पूर्तता केली जाते.
- फिशिंगचे स्कॅम्स. इतरांची वैयक्तिक वित्तीय माहिती मिळविण्यासाठी आपण बँका किंवा इतर वित्तीय संस्था असल्याचे किंवा त्यांच्याशी संलग्न असल्याचे भासवू शकत नाही. अशी माहिती मिळविण्यासाठी फिशिंगचे इतर प्रकार वापरणे सुद्धा आमच्या प्लॅटफॉर्म हाताळणी आणि स्पॅम धोरणाचे उल्लंघन आहे याची कृपया नोंद घ्या.
या धोरणाचे उल्लंघन न करणे म्हणजे काय?
वरती वर्णन केल्यानुसार, फसवे स्कॅम, फिशिंग किंवा इतर फसवणुकीची तंत्रे वापरणाऱ्या खात्यांवर Twitter कारवाई करते. Twitter वापरणाऱ्या व्यक्तींमधील वित्तीय वादामध्ये Twitter हस्तक्षेप करत नाही, जसे की:
- Twitter वर वस्तूंच्या विक्रीशी संबंधित दावे.
- व्यक्ती किंवा ब्रँड्सकडून विवादास्पद परतावे.
- मिळालेल्या वस्तूंच्या खराब गुणवत्तेबाबत तक्रारी.
या धोरणाच्या उल्लंघनाचा कोण रिपोर्ट करू शकते?
आमच्या समर्पित रिपोर्टिंग फ्लोवरून कोणीही खाती किंवा ट्विट्सबाबत रिपोर्ट करू शकते. आमच्या अंमलबजावणी प्रणाली अधिक चांगल्या करण्यास मदत करण्यासाठी आणि वर्तनाची नवीन व उदयोन्मुख प्रचलने आणि रचना ओळखण्यासाठी, हे रिपोर्ट एकत्रितपणे वापरले जातात आणि आपल्या रिपोर्टसाठी आपल्याला कदाचित वैयक्तिक प्रतिसाद मिळणार नाही.
या धोरणाच्या उल्लंघनाबाबत मी कसे रिपोर्ट करावे?
इन-अॅप
आपण खालीलप्रमाणे हा मजकूर इन-अॅप पुनरावलोकनामध्ये रिपोर्ट करू शकता:
- प्रतिकावरून ट्विट रिपोर्ट करा निवडा.
- हे संशयास्पद किंवा स्पॅम आहे असे निवडा.
- ट्विट कसे संशयास्पद आहे किंवा स्पॅम पसरवत आहे ते सर्वोत्तमरित्या सांगणारा पर्याय निवडा.
- आपला रिपोर्ट सबमिट करा.
डेस्कटॉप
आपण खालील प्रमाणे हा मजकूर डेस्कटॉपवर रिपोर्ट करू शकता:
- प्रतिकावरून ट्विट रिपोर्ट करा निवडा.
- हे संशयास्पद किंवा स्पॅम आहे असे निवडा.
- ट्विट कसे संशयास्पद आहे किंवा स्पॅम पसरवत आहे ते सर्वोत्तमरित्या सांगणारा पर्याय निवडा.
- आपला रिपोर्ट सबमिट करा.
आपण या धोरणाचे उल्लंघन केल्यास काय घडते?
या धोरणाचे उल्लंघन केल्याचे परिणाम हे उल्लंघनाचा प्रकार आणि गांभीर्य तसेच उल्लंघनांचा आधीचा इतिहास यानुसार बदलतात. आम्ही करत असलेल्या कारवाईमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
स्पॅम विरोधी आव्हाने
जेव्हा आम्हाला कृतींचे संशयास्पद स्तर आढळतात, तेव्हा खाती लॉक केली जाऊ शकतात आणि अतिरिक्त माहिती देण्यास (उदा., फोन क्रमांक) किंवा reCAPTCHA सोडविण्यास सांगितले जाऊ शकते.
URL ब्लॅकलिस्ट करणे
आम्हाला ज्या URLs असुरक्षित वाटतात त्यांना आम्ही ब्लॅकलिस्टमध्ये टाकतो किंवा चेतावणी देतो. आपली URL असुरक्षित असल्याचे आम्ही चुकून ओळखले असल्यास त्यावरून, असुरक्षित लिंक्स विषयी अधिक वाचा.
ट्विट हटवणे आणि खाते तात्पुरते लॉक करणे
जर उल्लंघन ही वेगळी घटना असेल किंवा पहिलाच गुन्हा असेल, तर आम्ही एक किंवा जास्त ट्विट्स हटवावे लागण्यापासून ते/ती खाते(ती) तात्पुरती लॉक करण्यापर्यंत कारवाई करू शकतो. स्कॅम, फिशिंग किंवा इतर फसवणुकीच्या तंत्रांमध्ये सहभागी होण्याचे पुन्हा प्रयत्न झाल्यास कायमस्वरूपी स्थगित केले जाऊ शकते.
कायमस्वरूपी स्थगिती
गंभीर उल्लंघनांमध्ये, सर्वप्रथम समजताच खाती कायमस्वरूपी स्थगित केली जातील. गंभीर उल्लंघनांच्या उदाहरणांत खालील घटकांचा समावेश होतो:
- वर वर्णन केल्याप्रमाणे धोरणांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करणारे वर्तन दर्शविणारी खाती चालविणे;
- स्थगित खाते बदलण्यासाठी किंवा त्याची नक्कल करण्यासाठी खाती तयार करणे.
अतिरिक्त संसाधने
आमच्या प्लॅटफॉर्म हाताळणी आणि स्पॅम धोरण याविषयी अधिक वाचा.