मिलार्ड फिलमोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मिलार्ड फिलमोर
मिलार्ड फिलमोर


सही मिलार्ड फिलमोरयांची सही

मिलार्ड फिलमोर (इंग्लिश: Millard Fillmore ;) (७ जानेवारी, इ.स. १८०० - ८ मार्च, इ.स. १८७४) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा तेरावा अध्यक्ष होता. व्हिग पक्षाचा सदस्य असलेला तो अखेरचा राष्ट्राध्यक्ष होता. बारावा राष्ट्राध्यक्ष झकॅरी टेलर याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत उपराष्ट्राध्यक्ष असलेला फिलमोर टेलराच्या मृत्यूनंतर अध्यक्षपदी बसला. ९ जुलै, इ.स. १८५० ते ४ मार्च, इ.स. १८५३ या काळात त्याने अध्यक्षपद सांभाळले.

त्याने मेक्सिकन-अमेरिकन युद्धांती अमेरिकेस जोडल्या गेलेल्या दक्षिणेकडील प्रदेशांतून गुलामीचे उच्चाटन करण्याच्या प्रस्तावास दक्षिणेकडील गुलामी-समर्थकांची मर्जी सांभाळण्यासाठी विरोध केला व इ.स. १८५०च्या तडजोडीस पाठिंबा दिला.

फिलमोर बफेलो विद्यापीठाच्या सहसंस्थापकांपैकी एक होता.

बाह्य दुवे[स्रोत संपादित करा]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.