विशेष लेख
|
मांगते चुंगनेजंग मेरी कोम १ मार्च, १९८३:कांगाथेई, मणिपूर, भारत - ) ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे. मेरी कोमने महिला जागतिक अव्यावसायिक बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. या स्पर्धेमधील फ्लायवेट प्रकारामध्ये कोमने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.
२०१३ साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले. २०१४ साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.
मणिपूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एका गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात कां उतरू नये, असे वाटू लागले. घरचा विरोध असतानाही इ.स. २००० मध्ये १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचॆ बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले; वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिने विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग तिचा जागतिक स्पर्धेतील विजेतेपदांचा धडाका सुरू झाला. अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुधा त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते. २००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने अजिंक्यपद पटकावले. तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिस्पर्ध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८ मध्ये तिने चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले होते.
पुढे वाचा...
मागील अंक: जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक मोबाईल ?
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
|
|
|
पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग
|
|
|
|
|
अलीकडील मृत्यू: एम. करुणानिधी, स्टीफन हॉकिंग, श्रीदेवी, पी.एन. भगवती, रीमा लागू, विनोद खन्ना, गोविंद तळवलकर, किशोरी आमोणकर, गौरी लंकेश
|
|
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र नैसर्गिक उपग्रह, ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, २ अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, ४ वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.
सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गात वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके वस्तुमान आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्तू नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून.
ऑगस्ट २४ २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये करण्यात आले. त्याच वेळी सेरेस व एरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.
(पुढे वाचा...)
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
|
|