गोपनीयता आणि सुरक्षितता याविषयी उत्तरे

आम्ही आपली वैयक्तिक माहिती खाजगी आणि सुरक्षित ठेवतो – आणि आपल्याला नियंत्रणात ठेवतो.

आपण आमच्या सेवा वापरता, तेव्हा आपण आपल्या माहितीसह आमच्यावर विश्वास ठेवता. आम्ही याचे काय करतो हे आपल्याला सांगून आम्ही प्रारंभ करू इच्छितो:

शोध, Gmail आणि नकाशे यासारख्‍या आमच्या सेवा प्रदान करण्‍यासाठी डेटा आम्‍हाला सक्षम करतो.

डेटा आम्हाला संबद्ध जाहिराती दर्शविण्यात मदत करतो, यामुळे आम्ही प्रत्येकजणासाठी आमच्या सेवा विनामूल्य करू शकतो.

आम्ही आपल्या वैयक्तिक माहितीची विक्री करीत नाही हे माहित करून घ्या.

आणि आम्ही संकलित करतो आणि वापरतो त्या माहितीचे प्रकार आपण नियंत्रित ठेवता.

शेवटी, कोणीही आपल्याला आणि आपल्या माहितीस सुरक्षित आणि संरक्षित ठेवत नाही.

Google कोणता डेटा संकलित करते?

आम्ही संकलित करतो त्या डेटाचे मुख्य प्रकार आपले मूलभूत खाते तपशील आणि आपण तयार करता त्या गोष्टी यासारख्या, आमच्या सेवा वापरून आपण करता त्या क्रियांवर आधारित असतात.

आपण आमच्या सेवा वापरता तेव्हा — उदाहरणार्थ, Google वर शोध घ्या, Google नकाशे वर दिशानिर्देश मिळवा किंवा YouTube वर व्हिडिओ पहा — आम्ही आपण करता त्या गोष्टींवर आधारित माहिती संकलित करतो जेणेकरून आपल्यासाठी आम्ही आमच्या सेवा अधिक चांगले कार्य करतील अशा बनवू शकतो. आपण Google खात्यासाठी साइन अप करता, तेव्हा आपले नाव, ईमेल आणि संकेतशब्द यासारखी, आपण आम्हाला देता ती मूलभूत खाते माहिती ठेवतो. आणि आमच्या सेवा वापरून आपण काय तयार करता ते आम्ही संचयित आणि संरक्षित करतो, जेणेकरून आपल्याला जेव्हा त्यांची आवश्यकता असते तेव्हा आपल्याकडे आपले ईमेल, फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवज नेहमी असतील.

आम्ही संकलित करतो आणि वापरतो त्या डेटाचे प्रकार नियंत्रित करण्यासाठी आपल्याला साधने देखील देतो.

Google कोणता डेटा संकलित करते याविषयी अधिक जाणून घ्या


Google संकलित करते त्या डेटाचे ते काय करते?

सर्वप्रथम, आपल्‍याकरिता आमच्या सेवा जलद, अधिक स्मार्ट आणि अधिक उपयुक्त बनविण्‍यासाठी आम्‍ही डेटा वापरतो, जसे की चांगले शोध परिणाम आणि समायोचित रहदारी अद्यतने प्रदान करणे. मालवेयर, फिशिंग आणि अन्य संशयास्पद कार्यकलाप यापासून आपले संरक्षण करण्यासाठी नमुने विश्लेषित करण्यात डेटा देखील आमची मदत करतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण धोकादायक वेबसाइटना भेट देण्याचा प्रयत्न करता तेव्हा आम्ही आपल्याला चेतावणी देतो. आम्ही आपल्याला संबद्ध आणि उपयुक्त असलेल्या जाहिराती दर्शविण्यासाठी आणि प्रत्येकजणाकरिता आमच्या सेवा विनामूल्य ठेवण्यासाठी, डेटा देखील वापरतो.

Google डेटा कसे वापरते याविषयी अधिक जाणून घ्या


Google माझ्या वैयक्तिक माहितीची विक्री करते?

नाही. आम्ही आपल्या वैयक्तिक माहितीची विक्री करीत नाही.

आम्‍ही दर्शवितो त्या जाहिराती अधिक संबद्ध आणि उपयुक्त बनविण्‍यासाठी, आपण केलेले शोध आणि आपले स्थान, यासारख्या विशिष्ट माहितीचा आम्‍ही वापर करतो. प्रत्येकजणासाठी शोध, Gmail आणि नकाशे यासारख्या आमच्या सेवा विनामूल्य करण्यासाठी आम्हाला सक्षम करतात त्या जाहिराती. आपण आम्‍हाला सांगत नाही तोपर्यंत, आपल्याला वैयक्तिकरित्या ओळखता येते अशा प्रकारची माहिती आम्ही जाहिरातदारांसह सामायिक करीत नाही. आमच्या जाहिरात सेटिंग्ज साधनासह, आपल्या स्वारस्यांवर आणि आपण केलेल्या शोधांवर आधारित जाहिराती आपण नियंत्रित करू शकता.

Google जाहिराती कसे दर्शविते याविषयी अधिक जाणून घ्या


माझा Google अनुभव नियंत्रित करण्यासाठी माझ्याकडे कोणती साधने आहेत?

Google आपल्यासाठी कार्य कसे करते हे नियंत्रित करण्यात आमच्याकडे आपल्याला मदत करणारी वापरण्यास-सुलभ साधने आहेत.

माझे खाते मध्ये, आपण आपली गोपनीयता आणि माहिती एकाच ठिकाणी व्यवस्थापित करण्यासाठी साधने शोधू शकता.

क्रियाकलाप नियंत्रणे मधील आमच्या डेटा नियंत्रणांसह, आपल्‍या शोध, YouTube आणि स्थान क्रियाकलापासह आम्ही ज्या प्रकारचा डेटा संकलित करतो तो आपण व्यवस्थापित करू शकता.

आमच्या जाहिरात सेटिंग्ज साधनासह, आपली स्वारस्ये आणि आपण केलेले शोध यावर आधारित जाहिराती आपण नियंत्रित करू शकता.

आमची साधने आणि सेटिंग्ज याविषयी अधिक जाणून घ्या


Google माझी माहिती सुरक्षित कशी ठेवते?

आपली माहिती सुरक्षित नसल्यास, ती खाजगी नाही. म्हणूनच जेव्हा आपण Google सेवा वापरता, तेव्हा आपण जगातील सर्वात प्रगत सुरक्षितता आधारभूत संरचनांपैकी एकाद्वारे संरक्षित असता.

1 अब्ज पेक्षा जास्त लोकांना संरक्षित करते असे, Google चे सुरक्षित ब्राउझिंग तंत्रज्ञान, जेव्हा आपण कदाचित मालवेयर किंवा फिशिंग प्रयत्न असलेल्या साइटला भेट देण्याचा प्रयत्न करता, तेव्हा आपल्याला चेतावणी देते.

कूटबद्धीकरण जेव्हा आपले डिव्हाइस आणि Google यामध्ये प्रवास करते तेव्हा आपली माहिती सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करते.

Gmail सुरक्षितता आपले कोणत्याही अन्य ईमेल सेवेपेक्षा स्पॅम, फिशिंग आणि मालवेयरपासून अतिशय चांगले संरक्षण करते.

आम्ही आपल्याला ऑनलाइन सुरक्षित कसे ठेवतो याविषयी अधिक जाणून घ्या


ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी मी काय करू शकतो?

आमची सर्व उत्पादने प्रगत ऑनलाइन सुरक्षिततेसह तयार केलेली आहेत. आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपण करू शकता अशा तीन सोप्या परंतु महत्त्वाच्या गोष्टी येथे आहेत.

आपले Google खाते सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यास मदत करण्यासाठी सुरक्षितता तपासणी नियमितपणे करा. यास फक्त काही मिनिटे लागतात.

एक सशक्त संकेतशब्द तयार करा, नंतर आपल्या Google खात्याशिवाय कोणत्याही गोष्टीसाठी तो कधीही वापरू नका.

आपल्या खात्यावर एक मोबाईल पुनर्प्राप्ती फोन नंबर जोडा, जेणेकरून आपण लॉक झाल्यास किंवा कोणीतरी अन्य व्यक्ती त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे असे आम्हाला वाटल्यास आम्ही आपल्या ओळखीची पुष्टी करू शकतो.

ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी आपण काय करू शकता याविषयी अधिक जाणून घ्या

माझी गोपनीयता आणि सुरक्षितता सेटिंग्ज व्यवस्थापित करण्यासाठी मी कुठे जाऊ शकतो?

आपली गोपनीयता आणि सुरक्षितता व्यवस्थापित करण्याकरिता साधने शोधण्यासाठी माझे खाते वर जा.

माझे खाते वर जा