मनस्विनी – पूर्णिमा शिंदे लग्न जुळण्यात मुलींचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. एक तर प्रमाण कमी आणि त्यात अटी भरमसाट, सामंजस्याचा अभाव, अपेक्षांच ओझं, करिअर, शिक्षण, स्वातंत्र्य, पॅकेज, गाडी, शेत, घर, फ्लॅट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विभक्त कुटुंबपद्धती हवी. मी तुम्हाला मागील पिढीने काय सहन केलं? काय होतं? किती केलं? हे सांगणार नाही. पण पर्यायाने तुलना करत असताना, तिथे हा फरक