Opens profile photo
Follow
Raj Thackeray
@RajThackeray
Official Twitter Handle Of Raj Thackeray

Raj Thackeray’s Tweets

काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते… Show more
209
4,017
देशाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून, विश्लेषण मांडून, उपाययोजना करणारे कृतिशील तत्वज्ञ, घटनाकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम ! #जयभीम #आंबेडकरजयंती #भिमजयंती #महाराष्ट्रधर्म #मराठीनेता #JaiBhim Show more
Embedded video
1:53
32.6K views
56
3,154
आधुनिक भारतात ज्या महात्म्याने ह्या समाजक्रांतीचा पुनर्जागर केला त्या क्रांतिसूर्याच्या कार्यकर्तृत्वाचा जागर आम्ही पुढची अगणित वर्ष करत राहू... महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन ! #MahatmaJyotibaPhule #IndianRenaissance Show more
Embedded video
1:31
26.5K views
44
2,824
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान ह्यांची आज जयंती. क्षमा, अहिंसा, समता, त्याग ह्यांचं सर्वोत्तम प्रकटीकरण म्हणजे भगवान महावीर. भगवान महावीर ह्यांना माझं कोटी कोटी नमन व महावीर जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏 #महावीरजयंती #MahavirJayanti
68
4,163
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र श्री. गिरीश बापट ह्यांचं निधन झालं. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय… Show more
Image
221
8,056
सस्नेह जय महाराष्ट्र! धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना… Show more
Image
966
27.5K
आज पक्षाचा १७वा वर्धापनदिन. गेल्या १७ वर्षांत महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड काम केलं. आमच्या कामाचा, आमच्या संघर्षाचा इतिहास, 'आम्ही काय केलं.' ह्या पुस्तिकेतून आपण मांडत आहोत. पुस्तिका जरूर डाउनलोड करा: mnsadhikrut.org/wp-content/upl
71
2,400
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपणा सर्वाना होळी व रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyHoli #होळी
Image
75
4,610
निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नवा कायदा होईपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करते. लोकशाही संस्थांची स्वायत्तता टिकायलाच हवी !
152
6,507
• महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. विरोध असेल समर्थन असेल ते सगळं पूर्वी समोरासमोर असायचं. मी मध्यंतरी बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या वेळेस विधानभवनात गेलो होतो, तेंव्हा समोर सगळे आमदार बसले होते, तेंव्हा कळतंच नव्हतं कोण कुठल्या पक्षाचा आहे. (२५/२५)
15
461
Show this thread
• म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय... महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्यावर मी २२ तारखेला गुढी पाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे. (२४/२५)
10
437
Show this thread
• भाषा ही तुमची ओळख असते, तुम्ही मराठी आहात म्हणजे तुम्ही मराठी बोलता म्हणून तुम्ही मराठी असता. (२३/२५)
3
280
Show this thread
• वाचन थांबलं तर तुमच्या विचारांना तोकडेपणा येतो, तो येऊ नये ह्यासाठी वाचन सुरु राहिलं पाहिजे. आपल्याकडच्या कॉफीशॉप्समध्ये पण पुस्तकं ठेवायला हवी ज्यातून आपोआप वाचनसंस्कृती वाढेल. (२२/२५)
1
279
Show this thread
• सध्या मराठीत नियतकालिकं बंद होऊ लागली आहेत हा चिंतेचा विषय आहे. वर्तमानपत्र आणि नियतकालिकांच्यात काम करणाऱ्यांनी वाचकांना उत्तम खुराक दिला पाहिजे आणि मराठी माणसांनी पण ह्या सगळ्यांचं वाचन चालू ठेवलं पाहिजे. (२१/२५)
1
200
Show this thread
• सध्या मी लता दीदींच्या पुस्तकावर काम करतोय आणि येत्या २८ सप्टेंबरला आम्ही ते पुस्तक आणतोय. त्यात लता दीदींच्या भाची रचना शाह आहेत, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र हे पण ह्या पुस्तक पत्रिकेत सहभागी आहेत. (२०/२५)
1
192
Show this thread
• स्व. बाळासाहेबांच्या फोटो बायोग्राफीच्या पुस्तकाच्या कव्हरवर मला ब्लॅक अँड व्हाईट फोटो हवा होता. ह्या फोटोत बाळासाहेबांचं कॅरेक्टर आणायचं होतं, त्या फोटोत एक जो गर्द अंधार आहे ते गूढपण आहे, चेहऱ्यावर जो लाईट दिसतोय तो शार्पनेस आहे आणि हातातील सिगार बेफिकीरी आहे. (१९/२५)
1
223
Show this thread
• तिथे मला लक्षात आलं की बाळासाहेबांची फोटोबायोग्राफी कशी असायला हवी. मी त्यावेळेस जवळपास १७, १८ हजार फोटो बघितले, त्यातले ७००,८०० फोटोज निवडले. (१८/२५)
1
191
Show this thread
• लंडनला एका दुकानात एक पुस्तक दिसलं, जे महात्मा गांधींचं होतं. ते पुस्तक मी बघायला गेलो आणि त्या पुस्तकांत मी गुंतून गेलो. त्या पुस्तकांत गांधींच्या आयुष्यातील बारीक सारीक घटनांचे फोटो आहेत. (१७/२५)
1
205
Show this thread
• माझ्या वडिलांनी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील सगळे फोटो काढले होते आणि राखले पण होते. मग इतक्या फोटोना कसा आकार द्यायचा हा प्रश्न होता. (१६/२५)
1
193
Show this thread
• बाळासाहेब नेहमी म्हणायचे मी कधी आत्मचरित्र लिहिणार नाही, मग एके दिवशी लक्षात आलं की आत्मचरित्र नाही तर फोटोबायोग्राफी करायला काय हरकत आहे. मग मी फोटो गोळा करायला सुरुवात केली. ही फोटोबायोग्राफी खरं तर माझ्या वडिलांमुळे घडली. (१५/२५)
1
176
Show this thread
• सध्या मला गिरीश कुबेरांची पुस्तकं आवडतात, त्यांचं तेल नावाचं इतिहास, एका तेलियाने, पुतीन, टाटायन ही पुस्तकं आवडली. तसंच दीपक करंजीरकरांचं घातसूत्र हे पुस्तक मला खूप आवडलं आहे. (१४/२५)
1
176
Show this thread