>> केक सर्वाचा आवडता आणि वाढदिवशी (बर्थ डे) त्याचे मोठे महत्त्व असते. चॉकलेट केक नाश्त्यामध्ये खाल्ल्याने वजन कमी होते, असे एका चाचणीमध्ये सिद्ध झाले आहे.

>> साखर न खाल्लेला माणूस सापडणे कठीणच. प्रत्येकाचे तोंड गोड करणारी साखर प्रथम भारतात तयार झाली.

>> मायक्रोवेव्हमध्ये पहिल्यांदा शिजवला गेलेला पहिला पदार्थ पॉपकॉर्न होता.

>> काही मासे तुमचे लक्ष वेधून घेतात. गोल्डफिश हा त्यापैकीच एक. दुर्मीळ असा हा मासा त्याचे डोळे कधीच बंद करत नाही.

>> खोटे बोलू नये, असे म्हणतात. पण कधी ना कधी खोटे बोलावे लागते. खोटे बोलता तेव्हा तुमचे नाक गरम होते.

>> मध हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ. हा पदार्थ औषधी आहे. याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मध कधीच खराब होत नाहे.

>> मांजर हा पाळीव प्राणी, त्याचे ६६ टक्के आयुष्य झोपून घालवते.

>> लिंबामध्ये स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक साखर असते.

>> जिराफ हा त्याच्या २१ इंच लांब जिभेने स्वत:चे कान साफ करतो.

>> अस्वलाचे दात कुणी मोजलेत? त्याला ४२ दात असतात.