भरतनाटय़म ही खरं तर दाक्षिण्यात्य संस्कृती आहे. त्यामुळे ते सादर करताना अधिकाधिक तमीळ, तेलुगू, संस्कृत भाषेत सादर केले जाते. मात्र, मराठी भाषेतील गाण्यांवर भरतनाटय़मचे सादरीकरण करून आपल्या लोकांना त्याची ओळख पटवून देणे यासारखी संस्कृतीची वेगळी ओळख नसावी.

८ फेब्रुवारी २०२० रोजी चेन्नई येथे झालेल्या १०००० भरतनाटय़म नर्तिकांच्या विश्वविक्रमात ‘‘नृत्यकला निकेतन’’ संस्थेच्या ६० विद्यार्थिनींनी गुरू अर्चना पालेकर आणि गुरू मयुरी खरात ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तिस-यांदा सहभागी होत तिसरा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला.

मुंबईमधून या विश्वविक्रमामध्ये सहभागी होणारी ‘नृत्यकला निकेतन’ ही एकमेव संस्था आहे. ‘‘नाटय़ांजली’’ हा जागतिक नृत्यमहोत्सव तामिळनाडू येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी आयोजित केला जातो. या महोत्सवात सहभागी होण्याचे हे नृत्य कलानिकेतनचे सलग ७ वे वर्ष आहे. नुकताच त्यांनी तंजापूरेश्वर, तिरूवायूर आणि बृहदेश्वर मंदिर येथे सादरीकरण केले, तर वेल्लोर येथील नारायणी लक्ष्मी मंदिरात देखील नृत्य सादरीकरणाची संधी मिळाली. शिवरात्रीच्या दिवशी या सर्व मंदिरात आणि दुस-या दिवशी चिदंबरम मंदिरात मिळालेले दर्शन केवळ अद्भुत आणि अवर्णनीय ठरल्याचे प्रशिक्षिका मयुरी खरात सांगतात.

मुंबईतील नृत्यकला निकेतन संस्थेच्या १२ विद्याथीर्नीनी गुरू अर्चना पालेकर, गुरू मयुरी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच अक्कलकोट येथे स्वामी समर्थाच्या पुण्यभूमीत मराठी गाण्यांवर भरतनाटय़म सादर केले. यावेळी खास स्वामी समर्थाची गाणी, दत्तगुरूंची गाणी घेऊन भरतनाटय़म केले.

निघालो घेऊन दत्ताची पालखी.. उठा उठा हो स्वामी समर्था.. विठू माऊली.. आदी गाण्यांवर सादरीकरण केले. कारण तेथे जाऊन भरतनाटय़म केले. यावेळी खास स्वामी समर्थाच्या गाण्यांवर सादरीकरण केल्याचे नृत्यकला निकेतनच्या प्रशिक्षक गुरू मयुरी खरात यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here