निवासस्थानासाठी वास्तू
घर एक अशी जागा आहे, जिथे आपण विश्रांती घेतो, आराम करतो आणि आपले कुटुंब आणि मित्रांसोबत सर्वाधिक वेळ व्यतीत करतो. हे एक असे ठिकाण आहे जिथे आपण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत अनेक आठवणी आणि भावनिक क्षणांचा आनंद उपभोगत असतो. घर हे त्यामुळेच सर्वाच्याच हृदयाजवळचे आहे. जर तुमच्या घराचे वातावरण सुसंगत आणि आरामदायक नसेल, तर ते तुमच्या संपूर्ण आनंद, समृद्धी व आरोग्यावर परिणाम करू शकते. तेव्हा कामावरून घरी आल्यानंतर तुम्हाला ताजेतवाने आणि आरामदायी वाटते का? तुमच्या कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचा संवाद चांगला आहे का? तुम्ही चांगल्या आरोग्याचा आनंद घेत आहात व रात्री तुम्हाला शांत झोप लागते का?

जर वरील खरे नसेल तर, तुमच्या घरात सकारात्मक कंपने आणि ऊर्जा समृद्ध करणे गरजेचे आहे. घराकरिता वास्तू (वास्तू फॉर हाऊस) हे तुमच्या घरात असे वातावरण तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे विपूल प्रमाणावर समृद्धी आणि आनंद मिळतो. घरासाठी वास्तू व्यक्तीच्या जन्मदिनांकानुसार आजूबाजूला असलेल्या अल्गोरिदमवर आधारित वैयक्तिक समाधान प्रदान करते आणि त्यात कोणतेही संरचनात्मक बदल किंवा तोडफोडीचा समावेश नाही.

स्वयंपाकघरासाठी वास्तू
तुमच्या कुटुंबात आता आणि सतत आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत का? तुमची आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती व समृद्धी तुमच्यासाठी चिंताजनक का आहे? त्याचे कारण तुमच्या स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा हे असू शकते, जे ऊर्जेचे केंद्र किंवा तुमच्या घराचे हृदय आहे. घरात स्वयंपाकघर ही नेहमीच एक अत्यंत महत्त्वाची जागा मानली जाते. पूर्वी मोठय़ा आकाराची स्वयंपाकघरे हा नियमच होता. पारंपरिक स्वयंपाकघर हे एका विशिष्ट दिशेने बांधण्यासाठी त्यावेळी कोणतेही कठीण व जलद नियम नव्हते.

स्वयंपाकघरासाठी सरळवास्तू तुमच्या स्वयंपाक घरात ऊर्जा असंतुलित करणा-या घटकांचा शोध घेण्यास तुम्हाला मदत करते. दिशा व संरचनात्मक स्थानांशी संबंधित घटक ऊर्जा असंतुलनासाठी जबाबदार असू शकतात. त्यानुसार आमच्या सरळ ४ विज्ञान आणि घरातील प्रमुख व्यक्तीच्या जन्मदिनांकाच्या आधारावर उपाय सुचविले जातात, जेणेकरून तुमच्या स्वयंपाक घरातील ऊर्जा संतुलित करता येईल.

शयन कक्षाकरिता वास्तू
तुम्हाला ठाऊक आहे की, नाते-संबंधांशी निगडित समस्या या तुमच्या बेडरूमची जागा आणि त्यामधील फर्निचर व वस्तूंच्या जागेसोबत जोडलेल्या असतात? तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुमची सतत वाद-विवाद होत आहेत का? पती किंवा पत्नीशी तुमचे संबंध सौम्य नाहीये का किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येताहेत का?

त्यासाठी स्वत:ला किंवा इतर कोणालाही दोष देऊ नका. त्याचे मूळ कारण तुमच्या शयन कक्षामध्ये किंवा त्यातील अंतर्गत मांडणीमध्ये असू शकते. शयन कक्षासाठी सरळवास्तू हे तुमच्या संबंधात येणा-या समस्यांच्या मूळ कारणाचे निदान करण्यास मदत करते. आमचे तज्ज्ञ तुमच्या घराच्या फ्लोअर फ्लॅन अंतर्गत रचनेचे अवलोकन करतात. या निरीक्षणांच्या आधारावर ते तुमच्या शयन कक्षेतील नैसर्गिक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळे येण्याची कारणे शोधतात, जी तुमचा आनंद आणि कल्याणावर परिणाम करतात.

अभ्यास कक्षासाठी वास्तू
शिकण्याची प्रक्रिया ही मानवासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींपैकी एक आहे. ही अनेक मार्गानी होते, जसे की, वाचणे, अभ्यास करणे, निरीक्षण करणे व ब-याच अन्य शारीरिक आणि अध्यात्मिक माध्यमातून ही प्रक्रिया घडत असते. सर्वसामान्य पद्धतीने अभ्यास केला जात आहे. अभ्यास करताना खूप लक्ष देणे, एकाग्रता व लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जर तुमची मुले किंवा तुमच्या घरातील अन्य कोणीही कोणत्याही प्रकारचा अभ्यास करताना त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नसतील किंवा शैक्षणिक प्रगती साधू शकत नसतील तर त्याचे कारण घरातील ऊर्जेची क्षेत्रे, खासकरून अभ्यासाची खोली असू शकते.

चांगले शिक्षण प्राप्त करणे हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून नसते, तर तुमच्या आणि तुमच्या घराच्या सभोवताली असलेल्या ऊर्जेवरदेखील अवलंबून असते. अभ्यास कक्षासाठी सरळवास्तू हे घरातील आणि अभ्यास कक्षाच्या वातारणातील अशा घटकांचे निदान करण्यास मदत करते, जे नकारात्मक स्पंदने निर्माण करतात आणि तुमचे लक्ष व अभ्यासातील एकाग्रतेवर परिणाम करतात.

पूजा घरासाठी वास्तू
तुमच्या घरातील सर्वात पवित्र व शुभ मानली जाणारी जागा म्हणजे पूजा घर किंवा प्रार्थना घर. हे एक असे ठिकाण आहे जेथे प्रत्येकाला मन:शांती व शांतता मिळते. ही एक अशी जागा आहे जेथे आपण आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी देवाची प्रार्थना करत असतो. म्हणून अशा शुभ ठिकाणाच्या सभोवताली कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल, तर त्याचे आपले कल्याण, नशीब, समृद्धी आणि यश यावर परिणाम होऊ शकतो.

तुमच्या प्रयत्नांमध्ये विलंबाचा तुम्ही सामना करताय आणि तुमच्या प्रार्थनांचे उत्तर मिळत नाहीये का? त्याचे कारण तुमच्या पूजा घरावर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हे असू शकते. पूजा घरासाठी सरळवास्तू हे तुमच्या घराच्या आणि पूजा घराच्या सभोवताली असलेली नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी मदत करते आणि साध्या व सोप्या उपायांचा वापर करून पूजा घरात सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.

शौचालय व स्नानगृहासाठी वास्तू
शौचालय व स्नानगृह ही अशी ठिकाणे आहेत, जेथे आपण स्वत:ला स्वच्छ व साफ करतो. ही अशी ठिकाणे आहेत, जी तुमच्या घराच्या वातावरणात सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा सोडतात. जर तुमच्या घरातील शौचालये व स्नानगृहे सुस्थितीत नसतील तर त्यामुळे जीवनात दुर्दैवी व अडथळे निर्माण करणा-या नकारात्मक ऊर्जेचा प्रचंड प्रवाह निर्माण होऊ शकतो. तर तुम्ही आर्थिक संकट आणि तोटासारख्या समस्येतून जात आहात?

तुम्ही मानसिक तणावाखाली आहात का आणि अलीकडे कोणता अपघात झालाय का? जर हो असेल तर तुमच्या शौचालय आणि स्नानगृहातील नकारात्मक ऊर्जा त्यास कारणीभूत असू शकते. शौचालय व स्नानगृहासाठी सरळवास्तू हे शौचालय व स्नानगृहांच्या स्थानामुळे आणि अन्य दिशात्मक घटकांच्या प्रादुर्भावाने असलेल्या नकारात्मक ऊर्जेच्या कारणांचे निदान करण्यास मदत करते. कोणतीही तोडफोड किंवा संरचनात्मक बदल न करता सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी सुचवलेले उपाय लागू करणे साधे आणि सोपे आहे.

मुख्य दरवाजासाठी वास्तू
मुख्य दरवाजा हा मानवी शरीराच्या तोंडाप्रमाणे आहे, जे निरोगी शरीरासाठी अन्न व पोषक आहार सेवन करण्याची परवानगी देते. म्हणूनच, जर घराचा मुख्य दरवाजाच सुस्थितीत नसेल तर घरातील मुख व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबात प्रचंड त्रास होऊ शकतो. जर तुम्ही आरोग्याची समस्या किंवा आर्थिक समस्येचा सामना करत असाल तर तुमचा मुख्य दरवाजा किंवा घरातील प्रवेश हा शुभ दिशेनुसार नसू शकतो.

मुख्य दरवाजासाठी सरळवास्तू हे मुख्य दरवाजाच्या दिशेमुळे घरातील ऊर्जेचे होणारे असंतुलन आणि त्यामुळे घरातील व्यक्तीला सामोरे जावे लागणा-या समस्या जाणून त्यांच्या कारणांचे निदान करते. शुभ दिशा या जन्मदिनांकानुसार आजूबाजूला असलेल्या विविध अल्गोरिदमवर आधारित असतात.

(संदर्भ : सरळ वास्तू)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here