नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिलायन्स इंडस्ट्रीची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ने ऑनलाईन फार्मसी नेटमेड्समध्ये ६० टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. रिलायन्सने हा व्यवहार ६२० कोटींमध्ये केला असून याची घोषणा केली.


आरआरव्हीएलने ही हिस्सेदारी व्हिटेलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये खरेदी केली आहे. या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांना नेटमेड्स नावाने ओळखले जाते. रिलायन्सने अन्य कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केटप्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये १०० टक्के मालकी खरेदी केली आहे.


या कंपन्यांची स्थापना प्रदीप दधा यांनी केली होती. नेटमेड्स सध्या औषधे, पर्सनल केअर, बेबी केअर सारखी उत्पादने विकते. ही कंपनी अ‍ॅपद्वारे डॉक्टर अपॉईंटमेंट बुकिंग आणि डायग्नोसिसची सेवाही देते. नेटमेड्सला जवळपास १ वर्षापासून खरेदीदाराची प्रतिक्षा होती. कारण मोठ्या प्रमाणावर कंपनीला पैशांची गरज होती.


रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालक ईशा अंबानी यांनी जारी केलेल्या एका पत्रकात याची माहिती देण्यात आली. नेटमेड्स सोबत आल्याने रिलायन्स रिटेलची गुणवत्ता आणि स्वस्त हेल्थकेअर उत्पादनांची सेवा देण्यात वाढ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here