डॉ. शैलेश उमाटे

तणाव व शरीरावर किंवा मनावर बसलेले आघात हे व्यसनाकडे जाण्याचे महामार्ग दिसून येतात. समलैंगिकात तणाव हा प्रत्येक टप्प्यात दिसतो. स्वत:च्या मनातच काहीतरी चुकीचं चाललंय, असे त्यांना वाटत राहते.

एलजीबीटीक्यू म्हणजे समलैंगिक व्यक्ती. ह्या व्यक्तीतील व्यसनाधीनता हा एक गंभीर विषय आहेच, पण तो बाकींच्या पेक्षा जरासा वेगळाही आहे. त्यांच्या व्यसनाधीनतेची मानसिकता वेगळी आहे.

राजेश ३० वर्षाचा युवक आहे. तो एका कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. तो एक समलैंगिक व्यक्ती आहे. ह्याबद्दल त्याने कोणालाही सांगितले नाही. त्याला तसं धाडसच होत नाही. तो नोकरी निमित्ताने कुंटुंबापासून लांब एकटाच राहतो. काही दिवसांपूर्वी त्याची मैत्री दुस-या एका समलिंगी व्यक्तीशी झाली. त्यांनी शारीरिक जवळीक साधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते भेटले. गप्पाटप्पा करीत असताना राजेशने त्याचे अल्कोहॉल घेत होता. तशी कधी कधी दारू पिण्याची राजेशला सवय होती. ही सवय त्याला त्याच्यात असणा-या असुरक्षिततेने लागली होती. व्यसन केल्यावर त्याच्या मनातील चलबिचल कमी व्हायची. त्या नादात तो दारूच्या व्यसनाकडे ओढला जात होता. याउलट त्याचा समलिंगी मित्र ह्या व्यसनात मुरलेला वाटत होता. त्याने एक पांढरी पावडर वितळली. ती एका इंजेक्शनमधून त्याच्या हातातल्या नसात घेतली. त्यानंतर त्याने राजेशला टऊटअ ची गोळी घ्यावयास भाग पाडले. ह्या गोळीने त्यांना शारीरिक जवळीक साधण्यास खूपच मदत होईल व ते क्षण परमानंदाचे असतील, असे त्या मित्राने राजेशला समजावून दिले. त्या नशेत त्या दोघांनीही प्रोटेक्शन वापरले नाही.

दुस-या दिवशी ह्या सर्व प्रकारामुळे राजेशला बराच तणाव जाणवत होता. त्याला काही इन्फेक्शन होईल का? अशी भीती वाटत होती. त्याने नशेच्या आहारी चूक केली हे जाणवत होते. त्यांचे हे ‘हाय रिस्क’ वागणे होते. हे लैंगिक इन्फेक्शन पसरविण्यास कारण ठरू शकतात.
समलैंगिकता व त्यांचे व्यसन हा एक विशिष्ट, अभ्यासनीय विषय आहे.
व्यसनाचे प्रमाण समलैंगिकात हे दुपटीने जास्त असते.
जवळजवळ ९०% समलैंगिक किशोरवयीन काही ना काही नशा करीत असतात.

समलैंगिकात दारूचे व्यसन २ पटीने जास्त असते. यात तंबाखूचा वापर २००% जास्त असते. २५% समलैंगिकांत अल्कोहलचं व्यसनच असते. ३-४ पटीने जास्त प्रमाणात समलैंगिक चरस, गांजा वापरतात. अ‍ॅम्फेटामीनचा वापर १२ पटीने जास्त करतात. ९.५ पटीने हेरॉईनचं व्यसन करतात. ही आकडेवारी अतिशय घातक दिसत आहे. यावरून, समाजातील इतर व्यक्तीपेक्षा समलैंगिकांत व्यसनाधीनता हे नक्कीच जास्त आहे.

व्यसनाधीनतेची वेगवेगळी कारण असतात. त्यात जेनेटीक हा महत्त्वाचे कारण आहे. सोबतच असलेला मानसिक आजार हे व्यसनाचे प्रमाण वाढवतात. त्यात उदासीनता, ओसीडी, एडीएचडी, चिंतेचे आजार व पीटीएसडी हे प्रमुख आजार आहेत.

तणाव व शरीरावर किंवा मनावर बसलेले आघात हे व्यसनाकडे जाण्याचा महामार्ग दिसून येतो. समलैंगिकात तणाव हा प्रत्येक टप्प्यात दिसतो. शरीर व मन वाढत असताना, स्वत:च्या मनातच काहीतरी चुकीचं चाललंय असे वाटते. त्यांच्या सेक्सुअल पसंतीबद्दल त्यांना विकृती जाणवते. त्यांना ते पापी आहेत ही भावना येते. त्यांच्या ह्या गोष्टी ते गुपित ठेवतात, तर त्यांना आपल्या मनाविरुद्ध वागल्याचे ओझे अंगावर वाटते. जर ते स्वच्छंदपणे, सगळ्यांना त्याच्या सेक्सूअल मोकळेपणाने सांगितले, तर त्यांना वाळीत टाकण्याचे, त्यांच्याबरोबर भेदभाव होण्याचे चान्सेस असतात. तसेच वेळप्रसंगी त्यांना मारझोड होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्या मनात अनिश्चिततेचे काहूर माजते. त्यांत चिंता, भीती, एकटेपणा, राग, अविश्वास निर्माण होतो. त्यातून त्यांच्या मनांत लांच्छन निर्माण होते व त्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यांच्या सेल्फ इस्टीम कमी होते. त्यामुळे त्यांच्या मनातच समलैंगिकतेची भीती यायला लागते. स्वत:ला स्वत:बद्दल घृणा जाणवायला लागते. ही काळ व वेळ यांना व्यसनाधीनतेकडे नेते. त्यांना व्यसनात मन:शांतीचा मार्ग सापडल्याचा भास होतो, पण ते एका मानसिक बिघाडीची सुरुवात असते.

हा त्यांचा व्यसनाकडे वळण्याचा प्रवास, दुस-या व्यक्तीतील व्यसनाधीनतेपेक्षा आगळा-वेगळा आहे. समलैंगिकांच्या व्यसनाचे उपचार व समुपदेशन करणा-यांना हा प्रवास माहिती असल्यास, खंबीरपणे त्यांचा इलाज सुव्यवस्थित होतो.

राजेशचाही असाच, व्यसनमार्गाचा प्रवास होता. त्याची ट्रिटमेंट केल्यावर त्याला त्याच्या ‘स्व’चा स्वीकार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here