धुळे/सोनगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पेश प्रकाश वाघ (वय ४० वर्ष) यांचा कोरोनाने नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसात धुळ्यातील दोन डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू

डॉ. कल्पेश वाघ यांना तीन दिवसापूर्वी लिव्हरच्या आजारासाठी धुळयातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू सोमवारी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने नाशिक येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्यांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला.

दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती जास्त खराब झाली व त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉ.कल्पेश प्रकाश वाघ हे मुळचे धुळयातील जुने धुळे परिसरातील राहणार होते. त्यांचे शिक्षण नांदेड येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. नंतर त्यांनी नांदेड मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण देखील घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here