Tweets

Du hast @PawarSpeaks blockiert

Bist du sicher, dass du diese Tweets sehen willst? Das Ansehen von Tweets wird @PawarSpeaks nicht entblocken.

  1. केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा आहे. राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  2. मालेगांव धारावीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जे सहकार्य तिथल्या लोकांनी केले तसेच सहकार्य औरंगाबाद शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल, अशी खात्री वाटते.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  3. खासगी डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझॅस्टर मॅनेजमेंट कायदा आहे त्यातील अधिकारांचा वापर करून खासगी डॉक्टरांना समन्स पाठवण्याचा विचार करावा लागेल.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  4. या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही यात जबाबदारीने लक्ष घातलं आहे. मात्र लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ज्या सूचना सरकार करत आहे त्याचे काटेकोर पालन जनतेकडून होताना दिसत आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  5. कोरोना लॉकडाऊन काळात स्थानिक लोकांनी अनेक सण साधेपणाने साजरे करून सर्व समाजाला एक उत्तम उदाहरण दिले आहे. प्रादुर्भावाचा डबलिंग रेट हा १४ दिवसांवरून ३० दिवसांवर जाणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिकांची नक्कीच मदत मिळेल, असा विश्वास वाटतो.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  6. कोरोना संकटावर मात करायची तर सर्वांनी एकत्र लढले पाहिजे. देशातील साधारण पाच-सहा राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे, त्यापैकी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या भागातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  7. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा मा. पालकमंत्री व आरोग्यमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा घेतला.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  8. आतापर्यंत विशेषतः महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाने बासी ईद, रमजान ईदच्या वेळेस अतिशय समंजसपणाची भूमिका घेतली. याचे उत्तम उदाहरण मालेगाव आहे. त्यामुळे असेच सहकार्य यापुढेही असेल असा मला विश्वास आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  9. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाला आवाहन आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढेल अशी भूमिका कोणी घेऊ नये.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  10. आरोग्याप्रमाणे आर्थिक संकटदेखील मोठे आहे. राज्यात नामांकित औद्योगिक केंद्रे आहेत. ही केंद्रं सुरू करून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  11. नाशिक जिल्ह्यातील गरजू कोरोना रुग्णांसाठी मी या महागड्या औषधांची उपलब्धता करून ५० औषधे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली आहेत. याआधी देखील २५ औषधे देण्यात आली होती तसेच गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी मी नेहमीच पुढाकार घेईन.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  12. राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. पण तेथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. असे करून चालणार नाही.जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये ही आमची भूमिका आहे. पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  13. राज्यात आपण टेस्टिंग वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  14. राज्याचे मा. मुख्यमंत्री यांनी मागील काही महिने कोरोनाशी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना द्यावा हा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आज नाशिक जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  15. अनेक तज्ज्ञांनी आपल्याला येत्या काळात कोरोनासोबत जगावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या जिल्ह्यांतील सर्व प्रमुखांची बैठक घेऊन, समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  16. भारतात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या ठिकाणी रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, सोलापूर, अकोला याठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही मुंबई येथील स्थिती अधिक वाईट आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  17. नाशिकमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  18. राज्यसभा खासदार म्हणून आज देशाचे मा. उपराष्ट्रपती श्री. यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. या सदनाची गरिमा जपण्यासाठी आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक बजावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  19. I was sworn in as a Member of the Rajya Sabha from Maharashtra today. I will do my utmost to uphold the dignity of this august house and discharge my duties as representative of the people.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  20. रयत शिक्षण संस्थेची नवी मॅनेजिंग कौन्सिल स्थापन झाल्यानंतर संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज पहिली बैठक डिजिटल पद्धतीने आयोजित केली. या बैठकीत पुढील तीन वर्षांच्या नेमणुका व कामाच्या जबाबदाऱ्यांचं वाटप मार्गी लावण्यात आलं.

    Rückgängig machen

Das Laden scheint etwas zu dauern.

Twitter ist möglicherweise überlastet oder hat einen vorübergehenden Schluckauf. Probiere es erneut oder besuche Twitter Status für weitere Informationen.

    Vielleicht gefällt dir auch

    ·