शॉर्ट व्हीडिओ निर्मितीकरिता उपयुक्त रोपोसो अ‍ॅपने महाराष्ट्रात चांगलीच लोकप्रियता मिळवली असून १ दशलक्षाहून अधिक मराठी युजर्स हे अ‍ॅप वापरत आहेत. अ‍ॅड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही मंचावर उपलब्ध असलेल्या या बहुभाषिक अ‍ॅपने प्रादेशिक पातळीवर लक्षणीय वाढ नोंदवली आहे. रोपोसोच्या दर दिवसाच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या १.८ दशलक्ष आहे. रोपोसोचा वापर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे हे नवीन प्रतिभेवर लक्ष केंद्रित करतात.

या अ‍ॅपमध्ये असलेल्या २५ चॅनेल्सबरोबरच (ज्यामध्ये संगीत, कॉमेडी, खाणं, प्रवास इ. वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत). ‘रोपोसो स्टार्स’ नावाचे नव्या आणि उत्सुक प्रतिभेला वाव देणारे चॅनलही आहे. महाराष्ट्रातील ‘रोपोसो स्टार्स’ने कॉमेडी, फॅशन, नृत्य इ. प्रकारातील अनेक व्हीडिओ बनवून आपले कौशल्य दाखवले आहे. युजर्सना अ‍ॅपमधील विविध टूल्स आणि फिल्टर्सचा वापर करून क्रिएटिव्ह व्हीडिओ बनवता येतात, जेणेकरून प्रेक्षकांना ते अधिक पसंत पडते.

रोपोसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मयंके भांगडिया म्हणाले, महाराष्ट्रातील यूजर्स एकदम क्रिएटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हीडिओ बनवतात जे भारताच्या इतर भागातील लोकही आवडीने पाहतात. आम्हाला सर्व राज्यांतील, अशा ताज्या दमाच्या आणि उगवत्या प्रतिभेला यापुढेही मदत करायची आहे. मागील एका वर्षात आम्ही ज्या काही योजना बनवल्या होत्या त्या आवडल्याचे या युजर्सच्या पाठिंब्यावरून दिसून येत आहे. मराठी भाषिकांच्या वाढलेल्या संख्येमुळे आम्हाला आणखी काही भारतीय भाषा समाविष्ट करण्यासाठी एक प्रकारचे बळ मिळाले आहे. नवीन प्रतिभा आणि नवीन भारतीय भाषा यामुळे आमचे हे वर्ष एकदम नावीन्यपूर्ण असणार आहे.

या मंचावरील उत्पन्नाच्या संधीने महाराष्ट्राचेही लक्ष वेधून घेतले आहे. गुंतवून ठेवणारे लहान लहान व्हीडिओ बनवून आणि या अ‍ॅपवर सक्रिय राहून यूजर्स विशेषत: प्रतिभावान महाविद्यालयीन विद्यार्थी आणि गृहिणी रोपोसो कॉईन्स मिळवू शकतात. जी नंतर पेमेंट गेटवेमार्फत रोख रकमेत बदलून घेता येतात. काही प्रमुख रोपोसो स्टार्स, कॉमेडी, फॅशन, नृत्य अशा विविध विषयांवरील व्हीडिओ बनवून महिन्याला ६०००-८००० रु.पर्यंत कमाई करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here