विशेष लेख
|
ऑपरेशन चॅस्टाइझ हे दुसऱ्या महायुद्धदरम्यान १६-१७ मे १९४३ च्या रात्रीत ब्रिटनच्या रॉयल एरफोर्सने जर्मनीच्या धरणांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या कारवाईचे सांकेतिक नाव होते. या मोहिमेचे वैशिष्ट्य हे की खास या मोहिमेसाठी प्रथमच उसळणाऱ्या बाँब (bouncing bomb) चा वापर करण्यात आला. या विशिष्ट रचनेच्या बाँबमुळेच ही कारवाई यशस्वी ठरली. लक्ष्यावर आदळल्यावर लगेच स्फोट न होता, उसळ्या घेत काही अंतर कापून फुटणारा हा बाँब बार्न्स वॉलिस यांनी शोधला व विकसित केला होता. या कारवाईअंतर्गत मॉहने आणि एडरसी धरणे उध्वस्त झाली तर सोर्पे धरणास जुजबी नुकसान झाले.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या रूर नदीच्या खोऱ्यातील औद्योगिक भागातून जर्मनीसाठी युद्धविषयक उत्पादन जोमाने होत होते. यात तेथील धरणे व जलविद्युत निर्मितीची केंद्रांचा मोठा वाटा होता. ही धरणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, कालव्यांसाठी पाणी पुरवठा या दृष्टीनेही महत्त्वाची होती. यामुळे ब्रिटनने यांच्यावर हल्ला करणे आवश्यक ठरवलेले होते. या धरणांना शत्रूपासून धोका आहे हे जर्मनीही जाणून होता त्यामुळे धरणांच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेण्यात आलेली होती. पारंपरिक पद्धतीने बाँबहल्ला करून धरणे उडवणे शक्य होते, पण त्यासाठी अचूक मारा आणि तोही सातत्याने योग्य त्या जागी करत राहणे गरजेचे होते. ब्रिटिश वायुसेनेकडे असे अचूक अस्त्र उपबलब्ध नव्हते. असे अस्त्र असल्यासही जर्मनीच्या बचावाची तयारी पाहता उघडउघड हल्ला शक्य नव्हता.
धरणाला अधिकाधिक नुकसान करण्यासाठी बाँबचा स्फोट पाण्याच्या पृष्ठभागाखाली व धरणाच्या भिंतीजवळ होणे आवश्यक होते. यासाठी पाण्याखाली मारा करणारे पाणतीर किंवा टॉर्पेडो वापरता आले असते. याची शक्यता लक्षात घेऊन जर्मनीने आधीच धरणांत पाणतीर विरोधी जाळ्या बसवल्या होत्या. दुसरा मार्ग होता की साधारण १० टन वजनाचा बाँब ४०,००० फूट उंचीवरून सोडून अपेक्षित ठिकाणी मारा करणे. पण त्यावेळी उपलब्ध विमानांची इतका वजनदार बॉम्ब घेऊन इतक्या जास्त उंचीवरून उडण्याच्या क्षमतेची नव्हती.
१६ मेच्या रात्री ९:२८ वाजता पहिल्या विमानाने उड्डाण केले. दुसऱ्या क्रमांकाच्या फळीतील ही विमाने उत्तरेकडून दूरच्या वाटेने लक्ष्याकडे जाणार होती. मॅककार्थीच्या विमानातून तेलगळती झाल्याने त्याने राखीव विमानातून ३४ मिनिटे उशीरा उड्डाण केले. पहिल्या क्रमांकाच्या फळीने ९:३९ पासून तीन विमानांच्या गटांत दहा-दहा मिनिटांच्या अंतराने उड्डाण केले. राखीव फळीने १७ मेच्या पहाटे ००:०९ वाजता उड्डाण केले.
गिब्सन आणि मॅककार्थीने आपले हल्ला जर्मनीच्या विमानविरोधी तोफांची ठाणी चुकवत दोन वेगवेगळ्या मार्गांनी नेले. असे असताही शत्रूच्या प्रदेशांत सगळ्यांनी साधारण एकत्रच प्रवेश करणे अपेक्षित होते. गिब्सनची फळी नेदरलँड्समध्ये घुसून शत्रूची ठाणी चुकवित उत्तरेला वळली आणि रुह्र नदीच्या काठाने पुन्हा दक्षिणेकडे वळत मॉहने धरणाकडे गेली. मॅककार्थीची फळी उत्तरेकडून नेदरलँड्समध्ये गेली व वेसेलजवळ गिब्सनला मिळाली. तेथून त्यांनी मॉहने धरण पार करीत सोर्पेकडे कूच केली.
पुढे वाचा...
मागील अंक:नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक मोबाईल ?
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
|
|
|
पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग
|
|
|
|
|
अलीकडील मृत्यू: एम. करुणानिधी, स्टीफन हॉकिंग, श्रीदेवी, पी.एन. भगवती, रीमा लागू, विनोद खन्ना, गोविंद तळवलकर, किशोरी आमोणकर, गौरी लंकेश
|
|
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र नैसर्गिक उपग्रह, ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, २ अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, ४ वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.
सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गात वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके वस्तुमान आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्तू नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून.
ऑगस्ट २४ २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये करण्यात आले. त्याच वेळी सेरेस व एरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.
(पुढे वाचा...)
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
|
|