Tweet

Bạn đã chặn @PawarSpeaks

Bạn có chắc muốn xem những Tweet này không? Xem Tweet sẽ không bỏ chặn @PawarSpeaks

  1. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन. शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या,परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या कर्मवीरांचे कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. विनम्र अभिवादन!

    Hoàn tác
  2. I am looking forward to encourage sugar production based on Sugar Beet cultivation in Maharashtra. It would extend the crushing season by 2 to 3 months which would strengthen the sugar industry and would be remunerative to the farmers.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  3. I truly appreciate the pioneering efforts of Shri Rana Gurjeet Singh ji, his sons and team of Rana Sugars Ltd. for the innovative and successful initiative to establish sugar mill based on Sugar Beet in Butter Seviyan village of Amritsar.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  4. अक्षय्य तृतीयेचा सण म्हणजे समृद्धी, आनंदाचे प्रतिक..पण यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. आजच्या या शुभ दिनी माझ्या बळीराजावरील सर्व अनिष्टं दूर होऊन इष्टप्राप्ती होवो, त्याच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो हीच सदिच्छा. आपणा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या अनंत शुभेच्छा!

    Hoàn tác
  5. उपासना, ईशपरायणता, भक्तीभाव, आणि संयमाची शिकवण देणार्‍या पवित्र रमजा़न महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.

    Hoàn tác
  6. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी साहित्य,कला,कुस्ती,शिक्षण,जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत अजोड कामगिरी केली. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. सर्वार्थाने प्रजेचे हित जपणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

    Hoàn tác
  7. यातून निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेचा फायदा घेणारी नक्षल प्रवृत्ती त्यामुळे पुढे आली. त्यांना विकासही नको आणि परिस्थिती तशीच राहावी ही त्यांची अपेक्षा आहे. त्यावेळी अंदाजपत्रकात गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी आम्ही स्वतंत्र विकासाचं बजेट दिलं होतं.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  8. माझ्याकडे जेव्हा राज्य सरकारची जबाबदारी होती तेव्हा पोलिस अधिकारी व आयएएस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न केवळ कायदा सुव्यवस्थेचा नसून विकासाच्या बाबतीत एखादा परिसर मागे राहिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून निर्माण झालेला आहे हे लक्षात आणून दिलं होतं.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  9. एक गृहमंत्री तिथल्या लोकांचा, अधिकाऱ्यांचा अत्मविश्वास वाढवण्यासाठी विकासकामाला गती देण्यासाठी, नक्षल गतिविधी थांबाव्यात म्हणून जीवापाड मेहनत घेतो आणि दुसरा गृहमंत्री या भागात फक्त पुष्पचक्र वाहायला जातो. खरं तर या मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारच नाही.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  10. आमचे सहकारी स्व. आर. आर. पाटील गडचिरोलीचे नसतानाही या विभागाचे पालकमंत्रीपद द्या, असा आग्रह धरला होता. दर महिन्यांतून त्यांच्या एक-दोन चकरा तरी गडचिरोलीत असायच्या. भामरागडच्या आतल्या भागात राज्याचे गृहमंत्री लोकांना धीर द्यायला मोटरसायकलवर जात होते.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  11. विद्यार्थ्यांची काळजी मागच्या वेळी आपण फी भरून घेतली. त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली. ३५-४० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आपण लाभ दिला. आज रोजगार हमीच्या कामावर महाविद्यालयीन विद्यार्थी येत आहेत. जूनमध्ये प्रवेश घ्यायला मुलं जातील तेव्हा कदाचित त्यांची फी भरण्याची ऐपत नसेल.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  12. काही ठिकाणी अजून वसुली चालू आहे याचं मला आश्चर्य वाटते. दुष्काळाच्या काळात आणेवारी कमी होते तेव्हा आपसुक वसुली थांबते. काही ठिकाणी लिलावाच्या नोटिसेस आल्याच्याही लोकांनी दाखवल्या. सहकारी कर्जांचं पुनर्गठन करावं लागेल. पुढच्या वर्षी थकबाकीदार शेतकऱ्याला नवीन कर्ज मिळणार नाही.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  13. सात-आठ वर्षांपूर्वी आपण चारा दिला. पशुंच्या मर्यादेची अट ठेवली नव्हती. पेंड मोफत पुरवली. त्याचा परिणाम असा झाला की ज्या वेळी आपल्या लोकांचं राज्य होतं तेव्हा चारा छावण्यांच्या काळात दुधाचं प्रमाण वाढलं. एकप्रकारचं समाधान शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर होतं. मात्र आज लोक त्रासलेले आहेत.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  14. दुसरं मोठं संकट पशुधनाच्या बाबतीतलं. पुत्रवत प्रेम असलेल्या जनावरांना पाणी-चारा देऊ शकत नाही या भावनेने संपूर्ण घरच अस्वस्थ होतं. बऱ्याच भागात जनावरांना ऊसाचं वाढ खायला देतात. परंतु नुसतं ऊसाचं वाढं देण्यामुळे जनावरांच्या तोंडात, जीभेमध्ये चरे पडतात. निव्वळ ऊसामुळे गरज भागत नाही.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  15. अमरावतीमध्ये संत्र हे महत्त्वाचं पीक. ही झाडं सुकली किंवा खराब झाली तर संपूर्ण शेतकरी व त्याचा संसार दुष्काळात उद्ध्वस्त होतो. आज ते संकट आपल्यावर आलंय.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  16. परवा मी सांगोल्याला सांगत होतो, एखाद्या हंगामाचं नुकसान होणं आणि फळबागाचं नुकसान यात फरक आहे. डाळिंबाच्या फळासाठी पाच वर्षे लागतात. त्यानंतर पंचवीस वर्षे काळजी नसते. पण पाच वर्षे थांबून डाळिंब बाग सुकली तर एकूण शेतकऱ्यांच्या आयुष्यातल्या तीस वर्षांचं नुकसान होतं.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  17. यापूर्वीही आम्ही दुष्काळाला तोंड दिलं होतं. पाच-सात वर्षांपूर्वी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा करून माणसं, पशु व शेती वाचवायचा प्रयत्न केला होता. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड या काही भागातलं मोसंबीचं पीक वाचवायला पैसे पुरवले. त्या फळबागा वाचवण्याची काळजी घेतली होती.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  18. महाराष्ट्रात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. परतीचा पाऊस आला नाही. कुटुंबातल्या व्यक्तींचा बराचसा वेळ पाणी आणण्यासाठी खर्ची होतोय. बऱ्याच ठिकाणी पेरण्याच झाल्या नाहीत. जिथे फळबागा होत्या त्या सुकून चालल्यात. शेतकरी हवालदिल झालेला आहे. पशुधनाची अवस्था आणखी गंभीर आहे.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  19. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सहकाऱ्यांच्या एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác
  20. सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

    Hiện chuỗi hội thoại này
    Hoàn tác

Tải trang có vẻ sẽ mất một lúc.

Twitter có thể đang bị quá tải hoặc tạm thời trục trặc. Thử lại hoặc truy cập Trạng thái Twitter để biết thêm thông tin.

    Bạn cũng có thể thích

    ·