विराट कोहली (५ नोव्हेंबर, इ.स. १९८८:दिल्ली, भारत - ) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपीएन च्या जगातील सर्वात जास्त विख्यात अॅथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. इंडियन प्रीमियर लीगच्यारॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे.
दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २००८मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. सुरुवातीला राखीव खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लवकरच भारताच्या मधल्या फळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने एकदिवसीय विशेषज्ञ हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला. त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले. त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
२०१२ मध्ये कोहलीची एकदिवसीय क्रिकेट मध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने अनेकदा कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोणीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.
इसवी सनाच्या आठव्या शतकताच्या पूर्वार्धात भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला मोठ्या लढाया झाल्या.
इ.स. ७१२ मध्ये सिंध राज्य जिंकल्यावर अरबांनी सिंधू नदीच्या पूर्वेकडे राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले. इ.स. ७२४ ते ८१० च्या दरम्यान उत्तरेकडील गुर्जर-प्रतिहार सम्राट नागभट्ट पहिला, दक्षिणेकडील चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा व इतर लहान भारतीय राज्ये यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या अरबांशी संघर्ष झाले. उत्तरेकडे सम्राट नागभट्टाने माळव्यावर चाल करून येणाऱ्या महत्त्वाच्या अरब मोहिमेचा पराभव केला तर दक्षिणेकडून विक्रमादित्याने आपला सेनानी पुलकेशी याला पाठवले. पुलकेशीने गुजरातमध्ये अरबांचा पराभव केला. इ.स. ७७६ मध्ये सैंधव नाविक दलाने अरबांच्या नाविक मोहिमेचा पराभव केला.
सम्राट हर्षवर्धनाच्या राजवटीनंतर आठव्या शतकाच्या सुरुवातीस उत्तर भारतात अनेक लहानमोठी राज्ये निर्माण झाली होती. वायव्येकडील प्रदेश काश्मीरचे कर्कोटा साम्राज्य व काबूलच्या हिंदू शाही या राज्यांच्या ताब्यात होता. उत्तर भारतातील प्रमुख शहर कनौज हे राजा यशोवर्मन याच्याकडे होते. ईशान्येकडे पाल घराण्याची सत्ता होती तर दक्षिणेस चालुक्यांची राजवट होती. पश्चिम भारतात सिंधचा राई राजवंश तसेच भिनमाळ, मंडोर, राजपीपळा व भरूच येथील अनेक गुर्जर कुळांची राज्ये यांची सत्ता होती. यांच्यातील अखेरचे प्रतिहार हे कूळ पुढे सामर्थ्यवान बनले. काठियावाडचे द्वीपकल्प अनेक लहान् राज्यांत विभागले होते व त्यांत मैत्रक राजवंश ही सर्वात प्रबळ सत्ता होती.
उमायद खिलाफतीच्या लष्करी विस्ताराचा तिसरा टप्पा इ.स. ६९२ ते ७१८ पर्यंत टिकला. खलिफा अल-वालीद पहिला याच्या इ.स. ७०५ ते ७१५ एवढ्या केवळ दहा वर्षांच्या कारकिर्दीत उमायादांचा मोठा विस्तार झाला. या काळात अरबांनी उत्तर आफ्रिका, स्पेन, सिंध व ट्रान्स ऑक्सियाना हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. उमायाद सेनापती मुहम्मद बिन कासिम याने राई वंशाच्या राजा दाहीर या सिंधी शासकाचा पराभव केला. अल् मन्सूरा राजधानी असलेला सिंध हा खिलाफतीचा दुसऱ्या दर्जाचा प्रांत झाला व तो अरबांसाठी भारतावर आक्रमण करण्याचा योग्य तळ होता परंतु बिन कासिम गेल्यावर त्याने जिंकलेले बहुतांश प्रदेश भारतीय राजांनी परत मिळवले.
मराठी विकिपीडियाचीप्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
"अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.
विकिपीडिया हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात: