विराट कोहली (५ नोव्हेंबर, इ.स. १९८८:दिल्ली, भारत - ) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपीएन च्या जगातील सर्वात जास्त विख्यात अॅथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. इंडियन प्रीमियर लीगच्यारॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे.
दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २००८मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. सुरुवातीला राखीव खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लवकरच भारताच्या मधल्या फळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने एकदिवसीय विशेषज्ञ हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला. त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले. त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
२०१२ मध्ये कोहलीची एकदिवसीय क्रिकेट मध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने अनेकदा कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोणीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.
प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज हा पॉपकॅप गेम्स यांनी तयार केलेला टॉवर डिफेन्स प्रकारचा एक दृश्य खेळ आहे. तो ओएस एक्स व मायक्रोसॉफ्ट विंडोजवर खेळता येतो. या खेळात एक घरमालक असून त्याच्याकडे विविध प्रति-झोम्बी प्लांट्स (झाडे) असून त्यांचा वापर करून त्याला त्याचे "मेंदू खाण्यासाठी" आलेल्या झोम्बींना पराभूत करता येते. मे ५, २००९ रोजी हा खेळ प्रथम प्रकाशित झालाव त्याच दिवशी तो स्टीमवरदेखील प्रकाशित झाला. आयओएस व आयपॅडसाठी साठी तो फेब्रुवारी २०१० मध्ये प्रकाशित झाला. आयपॅडमध्ये या खेळात उच्च स्पष्टता आहे. एक्सबॉक्स लाइव्ह आर्केडसाठीही हा खेळ उपलब्ध असून तो सप्टेंबर ८, २०१० रोजी प्रकाशित झाला. पॉपकॅप गेम्स एक निटेन्डो डीएस आवृत्ती जानेवारी १८, २०११ रोजी प्रकाशित केली. को-ऑप व व्हर्सेस प्रकारांसह मुखपृष्ठची प्लेस्टेशन ३ आवृत्ती फेब्रुवारी २०११ मध्ये प्रकाशित झाली. त्याची ॲन्ड्रॉइड आवृत्ती ॲमेझॉन ॲप स्टोरमध्ये मे ३१, २०११ मध्ये प्रकाशित झाली. फेब्रुवारी १६, २०१२ रोजी त्याची ब्लॅकबेरी प्लेबुकसाठीची आवृत्ती प्रकाशित झाली. विंडोज व मॅक आवृत्त्यांमध्ये नवीन गेम ऑफ द इयर आवृत्तींमध्ये झोंबाटारसारख्या अनेक नवीन सुविधांची भर पडली आहे. या खेळाला त्याच्या चिकित्सकांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. १५ ऑगस्त २०१३ रोजी या खेळाची दुसरी आवृत्ती प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज २: इट्स अबाउट टाइम ही आयओएससाठी प्रकाशित झाली.
या खेळात खेळाडूंकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे व कवक असून त्यांची प्रत्येकाची हल्ला करण्याची व टिकाव धरण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही सर्व झाडे वापरुन झोम्बींच्या कळपांना घरातील लोकांचे मेंदू खाण्यापासून थोपवता येते. खेळण्याचे क्षेत्र आडव्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असते. एक झोम्बी घराच्या दिशेने एकाच आडव्या पट्टीतून येतो. (जर त्याने गार्लिकचा (लसूण) भाग खाल्ला तर मात्र तो वेगळ्या पट्टीत जातो.) बहुतेक झाडे एकाच आडव्या पट्टीत मारा करतात किंवा मारा थोपवून धरतात. पुढील पातळ्यांमध्ये (लेव्हल्स) खेळाडू नवीन झाडे क्रेझी डेव्हच्या आभासी दुकानातून विकत घेऊ शकतात. विकत घेण्यासाठी लागणारे आभासी पैसे झोम्बींना मारुन व "झेन गार्डन" मधील झाडे विकून मिळू शकतात. (पुढे वाचा...)
मराठी विकिपीडियाचीप्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
"अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.
विकिपीडिया हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात: