सोल (कोरियन: 서울) ही पूर्व आशियामधीलदक्षिण कोरिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. १ कोटीहून अधिक शहरी व सुमारे २.५ कोटी महानगरी लोकसंख्या असलेले सोल हे ओईसीडी सदस्य देशांमधील सर्वाधिक तर जगातील १२व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. तसेच सोल महानगर तोक्योखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महानगर आहे.
सोलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट पायाभुत सुविधा असून येथील वाहतूक व्यवस्था अव्वल दर्जाची आहे. सोल महानगरी सबवे ही जगातील सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे आहे व येथील इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ जगात सर्वोत्तम मानला जातो.