कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

कर म्हणजे शासनाला सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय[ संदर्भ हवा ]. कर दोन प्रकारचे असतात - अप्रत्यक्ष करप्रत्यक्ष कर. करांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक प्राप्तीकर (आयकर), महामंडळकर, भांडवली नफाकर, भांडवलावरील आणि मालमत्तेवरील कर, खर्चावरील कर, वस्तूंवरील कर, उत्पादनावरील कर, आयातीवरील व निर्यातीवरील कर, विक्रीकर असे वेगवेगळे करांचे प्रकार आहेत. करवसुलीसाठी शासनाकडे यंत्रणा असते. करविषयक सल्लागारही असतात. कर भरण्यासाठी विविध योजना असतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.