तारकासमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आधुनिक खगोलशास्त्रामध्ये तारकासमूह (Constellation: कॉन्स्टेलेशन) हे इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने (आय.ए.यू.ने) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे.त्यानुसार संपूर्ण आकाश व्यापतात असे अधिकृत मान्यता असलेले एकूण ८८ तारकासमूह आहेत. [१]

खगोलीय निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला निःसंदिग्धपणे एक तारकासमूह नेमला जाऊ शकतो. खगोलशास्त्रामध्ये एखादी गोष्ट आकाशामध्ये अंदाजे कुठल्या भागात आहे हे दर्शवण्यासाठी त्या गोष्टीच्या निर्देशकांसोबत ती कोणत्या तारकासमूहात आहे हेही सांगितले जाते.

इतिहास[संपादन]

पुरातन बॅबिलोनिअन खगोलशास्त्र[संपादन]

चिनी खगोलशास्त्र[संपादन]

भारतीय खगोलशास्त्र[संपादन]

इस्लामी खगोलशास्त्र[संपादन]

आय.ए.यू. प्रणीत तारकासमूह[संपादन]

इ.स. १९२२ मध्ये हेन्‍री रसेल याने खगोलाला ८८ अधिकृत भागात विभागण्यात आय.ए.यू. ला मदत केली.[२] या प्रणालीचा हेतू खगोलाला सलग क्षेत्रात विभागणे हा होता.[१] शक्य तेवढ्या तारकासमूहांची नावे ग्रीक-रोमन नावांवरून घेण्यात आली. महाराष्ट्रात प्रचलित असलेली तारकासमूहांची काही मराठी नावे बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी नावांवरून रूपांतरित केली असली तरी बरीच नावे पुरातनकालापासून अस्तिवात असलेली संस्कृत नावे आहेत.[३] ८८ तारकासमूहांपैकी १२ तारकासमूह सर्वांनाच परिचित असतात. सूर्याच्या आकाशातील भासमान भ्रमणमार्गावर, आयनिक वृत्तावर असलेले बारा तारकासमूह भारतात ‘राशी’ या नावाने ओळखले जातात.[३] या राशींव्यतिरिक्त उत्तर व दक्षिण आकाशात अनेक तारकासमूह आहेत. ८८ पैकी ३६ तारकासमूह मुख्यत: उत्तर गोलार्धात आहेत आणि ५२ तारकासमूह दक्षिण गोलार्धात आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ द कॉन्स्टेलेशन्स (The Constellations). IAU—आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ. १४ मार्च, २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  2. द ओरिजिनल नेम्स ॲन्ड ॲब्रिव्हिएशन्स फॉर कॉन्स्टेलेशन्स फ्रॉम १९२२ (The original names and abbreviations for constellations from 1922.). १४ मार्च, २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  3. ३.० ३.१ नायक, प्रदीप (१४ जानेवारी २००९). तारकासमूह. लोकसत्ता. १४ मार्च २०१६ रोजी पाहिले.