तीन दिवसांनी यशवंतराव चव्हाण यांची १०४ वी जयंती साजरी केली जाईल. यशवंतराव मुख्यमंत्री असताना सांगायचे की, ‘राज्य चांगलं चाललं आहे, असं राज्यकर्त्यांना वाटून उपयोग नाही. ते लोकांना उपयोगी वाटलं पाहिजे’. आजच्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत यशवंतरावांच्या या वक्तव्याची तपासणी करायचे म्हटले, तर हे राज्य चांगले चालले आहे, असे म्हणता येणार नाही. निदान लोक तरी तसे म्हणत नाहीत.