अन्न-नासाडी थांबवा!2011-06-27 Maharashtra Times अन्नाची नासाडी टाळण्यासाठी केंद सरकार देशभर मोहीम हाती घेणार असल्याचे वृत्त आश्वासक असले, तरी असा उपक्रम राबविण्याची पाळी यावी, हे दुदैर्वी आहे. देशाची आथिर्क प्रगती होत असली आणि त्याची दृश्य फळे अनेक ठिकाणी दिसत असली, तरी देशातल्या सर्वच थरांमध्ये आथिर्क संपन्नता निर्माण झालेली नाही. उलट अजूनही देशातल्या २३ कोटी लोकांना पुरेसेे अन्न मिळत नाही....
पुण्यनगरीत अवतरली पंढरी2011-06-27 Esakal पुणे - टाळ-मृदंगाच्या निनादामध्ये समूहस्वरांत आळविलेले अभंगाचे सूर... वैद्यकीय तपासणीपासून ते खाद्यपदार्थांचे वाटप आणि दाढी-कटिंग करण्यापासून ते चपला-बूट दुरुस्ती या माध्यमातून वारकऱ्यांची केलेली सेवा... शहरातील प्रेक्षणीय स्थळांना वारकऱ्यांनी दिलेली भेट... पालखी आणि माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी... अशा भक्तिपूर्ण...
पाचगणी नटले हिरवाईने !2011-06-26 Maharashtra Times म. टा. वृत्तसेवा, कराड सध्या पावसाने सुटट्ी घेतली असली तरी जूनच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यात बरसलेल्या पावसाने महाराष्ट्राचे काश्मिर असलेल्या महाबळेश्वर - पाचगणीचे रुपडे पालटले असून सारा परिसर हिरवाईने नटला आहे. या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांबरोबर स्थानिकांचाही लोंढा वाढला आहे.निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, आकाशाशी स्पर्धा करणारे मोठाले...
उत्तर महाराष्ट्रात पेरण्या ५ टक्केच2011-06-26 Maharashtra Times अपुऱ्या पावसाचा फटका , शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान म. टा. प्रतिनिधी, नाशिक मोसमाच्या सुरुवातीला अत्यंत झोकात हजेरी लावून नंतर अचानक गायब झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच पेचात पकडले आहे. जून महिना कोरडा जाऊन अद्यापही पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे...
रामदेवबाबांचे सिब्बलना चॅलेंज2011-06-26 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली मी केंद्र सरकारशी चर्चा करुन तडजोड केली होती, हा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांचा दावा खोटा आहे. चर्चा झाली होती, तर सिब्बल यांनी त्या चर्चेचे सगळे तपशिल जाहीर करावेत ; अशा शब्दात योगगुरू रामदेवबाबा यांनी कपिल सिब्बल यांना आव्हान (चॅलेंज) दिले आहे. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनावर पोलिसांनी...
सचिनभेटीमुळे फेडररही सुखावला2011-06-26 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । विंबल्डन ' आज माझ्या आयुष्यातील खास दिवस आहे. एक चांगला सामना खेळता आला आणि क्रिकेटचा महान तारा असलेल्या सचिन तेंडुलकरला भेटता आले ' ... हे उद्घार आहेत टेनिसचा बादशाह असणा-या रॉजर फेडररचे. विंबल्डनच्या हिरवळीवर झालेल्या सचिन-रॉजर ऐतिहासिक...
सायनाची 'हॅटट्रिक' हुकली2011-06-26 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । जकार्ता इंडोनेशियन ओपन स्पर्धेत जेतेपदाची ‘ हॅटट्रिक ’ करण्याचं सायना नेहवालचं स्वप्न आज भंगलं. चीनच्या यिहान वँगनं चुरशीच्या लढतीत गतविजेत्या सायनाचा १२-२१, २३-२१, १४-२१ असा पराभव केला आणि इंडोनेशियन ओपनमधील तिची विजयाची मालिका खंडीत केली. भारताची ‘ फुलराणी ’ सायनानं गेल्या सहा महिन्यात फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. त्यामुळे...
बोल्टला पाहायचीय सचिनची धाव2011-06-25 Maharashtra Times किंगस्टन अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर विश्वविक्रमी धाव घेणाऱ्या युसेन बोल्टला प्रत्यक्ष धावताना पाहण्याची महत्त्वाकांक्षा अनेकजण बाळगतात, पण दस्तुरखुद्द बोल्टलाही कधीतरी प्रेक्षक होऊन एका स्टार खेळाडूचा खेळ पाहण्याची इच्छा आहे. आणि तो खेळाडू आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. बोल्ट म्हणतो, 'मी ज्या...
साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा2011-06-25 Esakal पिंपरी - 'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' या उक्तीचा प्रत्यय शुक्रवारी (ता. 24) पिंपरी-चिंचवडकरांना आला. विशेषतः पालखीचा उद्योगनगरीतील दुसरा मुक्काम असलेल्या संत तुकारामनगर व परिसरात तर दिवाळी व गुढीपाडवा हे सण शुक्रवारी एकाच दिवशी साजरे झाले. वल्लभनगर व संत तुकारामनगरमधील रहिवाशांनी गुढ्या उभारून आणि...
'पीएमपी'नेच कंडक्टरला अडीचशेची चिल्लर द्यावी2011-06-25 Esakal पुणे - 'सुटे पैसे देण्यास नकार देणाऱ्या कंडक्टरची माहिती हेल्पलाइनवर कळवा,' हे पीएमपीने प्रवाशांना केलेले आवाहन केवळ धूळफेक असल्याचा आरोप पीएमपी प्रवासी संघाने केला आहे. बसमध्ये जाण्यापूर्वीच पीएमपीने संबंधित कंडक्टरला अडीचशे रुपयांची चिल्लर दिली पाहिजे, अशी सूचना संघाने केली आहे. पीएमपीचे...
जबाबदारी आपत्ती व्यवस्थापनाची2011-06-28 Maharashtra Times भावेश ब्राह्माणकर । नाशिक पावसाळा सुरू झाला की, जिल्हा प्रशासनासह सर्वच विभागांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी लगबग सुरू होते. पूर, वादळ, वीज कोसळणे, अतिवृष्टी यासह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यकच आहे. त्यासाठी विविध यंत्रणा सज्ज असतात. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येते....
वडजे यांच्या कथा बोलतात...2011-06-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी । नाशिक कथेतील पात्रे वाचण्यापेक्षा ती ऐकताना अधिक कळत जातात. ती आवाजातील वैविध्यातून सामोरी आली की आपलीशी वाटतात. म्हणून या कथा बोलल्या तर अधिक भावतात... या भावनेतून ललित कला महाविद्यालयातील प्राचार्य रमेश सुभाष वडजे यांनी एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी स्वत:च्या सहा कथांचे ऑडियो सीडीत रुपांतर केले आहे....
महागाईविरोधातील संताप तीव्र2011-06-28 Maharashtra Times अनेक ठिकाणी आंदोलने सुरूच म. टा. वृत्तसेवा । मनमाड केंद सरकारने गॅस सिलिंडर, इंधन दरवाढ केल्याने सर्वसामान्य रहिवाशांचा संयम सुटला आहे. राज्य सरकार इंधनावरील टॅक्स कमी करण्याच्या विचारात असले आणि अर्थमंत्री प्रणव मुखजीर् यांनी तसे आवाहन केले असले...
अण्णा हजारे यांचा अर्ज कोर्टाने फेटाळला2011-06-28 Maharashtra Times म. टा. वृत्तसेवा । जळगाव ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका सभेत बदनामी केल्यानंतर त्यांच्या विरोधात आ. सुरेश जैन यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची सुनावणी सोमवारी जळगाव कोर्टात झाली. यावेळी अण्णा हजारे यांनी मुदतीसाठीचा आपला अर्ज हायकोर्टाने नामंजूर केल्यानंतर आपल्याला सुप्रीम कोर्टात जायचे आहे, असे सांगत अजून मुदत मागितली. मतब्बल...
अण्णा हजारे करणार जनजागृती दौरा2011-06-28 Maharashtra Times म. टा. वृत्तसेवा । जळगाव राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर १६ ऑगस्टपासून बेमूदत उपोषणाला बसण्यापूवीर् आपण देशभर जनजागृती दौरा करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले. आ. सुरेश जैन...
महापालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे खाटीक विजयी2011-06-28 Maharashtra Times म. टा. वृत्तसेवा । जळगाव महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 61 साठी रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद खाटीक हे 1133 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी खान्देश...
धुळ्याच्या उपमहापौरपदी शव्वाल अन्सारी2011-06-28 Maharashtra Times सेनेच्या परदेशी यांचा १३ मतांनी पराभव म. टा. वृत्तसेवा । धुळे धुळे महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक शव्वाल अन्सारी यांनी ३७ मतांसह विजय मिळवला आहे. त्यांचे विरोधक शिवसेनेचे नगरसेवक नरेंद...
होळकरांच्या गाण्यावर येवल्यात शुटिंग2011-06-28 Maharashtra Times गौतम संचेती । मनमाड अनेक मराठी चित्रपटासाठी गीते लिहिणारा व तीन राज्य पुरस्कार मिळवलेला लासलगावचा कवी प्रकाश होळकर महाराष्ट्राला परिचीत आहे. परंतु त्याच्याच मातीत त्यांच्या गाण्यावर थिरकरणारे ५० कलाकार व त्याचे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांनी उभी केलेली मोठी टीम ही लासलगावच्या लोकांसाठी नवलाईच. निर्माती निलिमा लोणारी यांच्या चिनू या चित्रपटासाठी...
उर्दू माध्यमासाठी विभागीय अभ्यासकेंद2011-06-28 Maharashtra Times म. टा. वृत्तसेवा । मनमाड लोकभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातफेर् मालेगाव शहरातील उर्दू माध्यमासाठी विभागीय अभ्यासकेंद सुरू करण्यात येत असल्याची माहिती कुलगुरु डॉ. आर. कृष्णकुमार यांनी दिली. या अभ्यासकेंदाची माहिती देण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातफेर् इस्कस लायब्ररी येथे आयोजित...
इंडिया बुल्सच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन2011-06-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी 'इंडिया बुल्स'ने सेझसाठी ताब्यात घेतल्याचा आरोप करीत, तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीने सोमवारी राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या कार्यालयासमोर इंडिया बुल्सच्या विरोधात धरणे आंदोलन केले. इंडिया बुल्स कंपनीच्या वतीने सिन्नर तालुक्यात मल्टीप्रॉडक्ट सेझची उभारणी इंडिया बुल्स निओ...
अपहृत मुलीच्या हत्येचे कारण गुलदस्त्यात2011-06-28 Maharashtra Times पंचवटीतील घटना; प्रतीक्षा पोस्टमॉटेर्म रिपोर्टची म. टा. प्रतिनिधी पंचवटीतील अपहृत मुलीच्या हत्येची घटना रविवारी उशिरा उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केलेली असली, तरी हत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. दिंडोरी रोडवरील माकेर्ट यार्डात काम करणाऱ्या हसीना...
'सेतू'सोबत पुरवठा विभागही 'ऑनलाइन'2011-06-28 Maharashtra Times प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू म. टा. प्रतिनिधी विविध प्रकारचे सरकारी दाखले देणारे सेतू कार्यालयाचे तसेच जिल्हा पुरवठा विभागाचे कामकाज सोमवारपासून ऑनलाइन झाले. विभागीय आयुक्त जयंत गायकवाड यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. या दोन्ही सेवांद्वारे जिल्हा प्रशासनाने माहिती तंत्रज्ञानाची कास धरत ऑनलाइन कामकाजाला प्राधान्य दिले. प्रायोगित...
२५२ रिक्षांवरील कारवाईला गती मिळेना2011-06-28 Maharashtra Times ' आरटीओ'च्या असहकारामुळे बेशिस्त रिक्षाचालक मोकाट म. टा. प्रतिनिधी वारंवार कारवाई करूनही शिस्तीच्या मार्गावर न येणाऱ्या शहरातील २५२ रिक्षांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेने 'आरटीओ'ला सादर केला होता. मात्र गेल्या सहा महिन्यांत या रिक्षांवर तातडीने कारवाई करणे तर दूरच, त्याबाबतची स्थितीही कळविण्याची तसदी 'आरटीओ'ने घेतलेली नाही. 'आरटीओ'च्या या...
ट्रॅव्हल्स बस आणि कूल कॅब चालकांना शिस्तीचे धडे2011-06-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम हाती घेणाऱ्या वाहतूक शाखेने रविवारी महामार्ग बसस्थानकालगत आपली वाहने उभी करणारे ट्रॅव्हल्स बसचालक तसेच कूल कॅबचालकांना शिस्तीचे धडे दिले. रस्त्यांवर बिनदिक्कत पार्किमग करणाऱ्या या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी...
पहिल्या पावलासाठी लगबग2011-06-28 Maharashtra Times अकरावी प्रवेश फॉर्म घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गदीर् म.टा.प्रतिनिधी अकरावी अर्थात कॉलेज जीवनाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग महाविद्यालयांमध्ये दिसून येत होती. दहावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर सोमवारपासूनच अकरावीची अर्ज विक्री...
निकालाबाबत साशंक असलेल्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी एकत्र यावे2011-06-28 Maharashtra Times अभाविप'चे आवाहन म. टा. प्रतिनिधी, नाशिक मार्च - एप्रिल महिन्यात झालेल्या टीवायबीकॉमच्या निकालामध्ये तीन विषयांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास झाले असून विद्यार्थ्यांमध्ये या निकालाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अशा सर्व...
तिसरा दिवस ठरला अनलकी...2011-06-28 Maharashtra Times जे . डे यांच्या हत्येसाठी कालिया आणि त्याच्या गँगने ९ आणि १० जून रोजी आर मॉलजवळ फिल्डिंग लावली होती . मात्र , दोन दिवस ते तेथे फिरकलेच नाहीत . ११ जूनचा दिवस मात्र त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला . तीन बाइक्स आणि एका क्वालिसमधून पाठलाग करत मारेकऱ्यांनी जे डे यांना स्पेक्ट्रा बिल्डिंगजवळ गाठले आणि त्यांची हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सातपैकी पाच जण...
इंधन दरवाढीमुळे वाहतूकही महागणार Esakal2011-06-25 पुणे - वाहतूक व्यावसायिकांना अगोदरच विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असताना, डिझेलची दरवाढ झाल्याने वाहतुकीचे भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे वाहतूक व्यावसायिकांनी शुक्रवारी स्पष्ट केले. विशेषतः...
बांधकाम सुरू असलेला फ्लॅट घेताय? Maharashtra Times2011-06-24 म . टा . व्यापार प्रतिनिधी इमारत बांधली जात असताना त्यात घर बूक करणारे अनेक जण असतात . तयार घरांपेक्षा निर्मितीप्रक्रियेतील घरांसाठी दर थोडा कमी बसतो , पैसे उभे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो , हा विचार त्यामागे असतो . पण संबंधित प्रकल्प वेळेत पूर्ण करणे काही बिल्डरना शक्य होत नाही , असे समजल्यावर बांधल्या जात असलेल्या इमारतीत घर घेण्याचा विचार करणारे...
पाऊले चालती पंढरीची वाट... Esakal2011-06-24 चार वर्षांपूर्वी "विठ्ठल-विठ्ठल" या ब्लॉगच्या माध्यमातून ई-सकाळने पहिली इंटरनेट वारी केली. इंटरनेट वारीची संकल्पना सकाळने सर्वप्रथम रुजवली. त्याला वाचकांनी धो-धो प्रतिसादही दिला. परदेशी वाचकांसाठी तर ही पर्वणीच होती. वारीत चालताना येणारे वारकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवित असतो. ते चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारचे असतात....
पावसाची विश्रांती, पेरणीला गती Esakal2011-06-23 कोल्हापूर - पावसाने दडी मारल्याने ऐन मॉन्सुनात वैशाख वणव्याचा अनुभव येत आहे. शहरासह जिल्ह्यातील गगनबावडा वगळता इतर तालुक्यांत पावसाने विश्रांती तर घेतली आहेच; पण दिवसभर कडाक्याच्या उन्हाचा अनुभव येत आहे. परिणामी, पावसाळ्यात अंगाची...
कांद्याच्या उत्पादनात 25 टक्क्यांनी घट Esakal2011-06-23 पिंपळगाव - बिगरमोसमी पावसाचा फटका व दरातील अनिश्चितता, यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनात तब्बल 50 लाख क्विंटल घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पोळ (लाल) रांगडा, गावठी कांद्याचे वर्षभरातील उत्पादन हे दोन कोटी क्विंटलपर्यंत असते. 2010- 11 मध्ये उत्पादनात घसरण होत ते दीड कोटी क्विंटल होऊ शकले असते. उत्पादनात सुमारे 25 टक्के...
तुकोबारायांच्या पालखीची सव्वातीनशे वर्षे पूर्ण Maharashtra Times2011-06-23 लुक बदलला तरी भूक कायम सुनील लांडगे वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचा मानदंड असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सव्वातीनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. शहरीकरणात वारीचे बाह्यरुप बदलले तरी अंतरंग कायम आहे. विठ्ठलभेटीची भूक तीच मात्र तिथपर्यंत पोचण्याची माध्यमे बरीच आहेत. महाराष्ट्रात पंढरीच्या वारीची परंपरा खूप आधीपासून आहे. मात्र, या...
महिलांमध्ये चारचाकी वाहनांची वाढती क्रेझ Esakal2011-06-23 जळगाव - शहरात एकूण 10 मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहेत. चारचाकी गाडी शिकण्यासाठी महिन्याला 20 महिला उत्सुक असतात. आजच्या आधुनिक काळात महिलांचे क्षेत्र कुठलेही असले तरी गाडी चालविणे महिलांनाही गरजेचे झालेले आहे. त्यासाठी आता चारचाकी वाहने चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. एकेकाळी महिलांचा...
नांदेडला प्ले ग्रुप, नर्सरी शाळांचे पीक झाले उदंड Esakal2011-06-23 नांदेड - नांदेडमध्ये गेल्या काही वर्षांत प्ले ग्रुप आणि नर्सरी शाळांचे पेव मोठ्या प्रमाणावर फुटले आहे. गल्लोगल्लीत अशा शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्यांच्यावर ना शासनाचा निर्बंध आहे ना महापालिकेचा. त्यामुळे जो तो उठतो आणि प्ले ग्रुप आणि नर्सरीची शाळा सुरू करतो, असाच प्रकार सध्या पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रवेशासाठी पालकांना...
मेघा मेघा.. काले मेघा.. अब तो बरसो.. Esakal2011-06-23 नांदेड - जिल्ह्यात मृग नक्षत्राचा समाधानकारक पाऊस झाला नाही. मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला; मात्र मृग नक्षत्रात ओल निर्माण होईल असा पाऊस झाला नाही. मृग नक्षत्राचे वाहन म्हैस होते. त्यामुळे पाऊस चांगला होईल अशी अपेक्षा होती; परंतु शेतकऱ्यांनी बांधलेले सगळे आडाखे चुकीचे ठरले आहेत. आता अर्धा जून महिना संपला तरी पेरणीयोग्य पाऊस नसल्याने जिल्ह्यातील...
विवेकाची वाटचाल Maharashtra Times2011-06-21 डॉ. रामचंद देखणे पालखी सोहळा हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव आहे. नदी सागराला मिळते आणि सागररूप होते, तशीच ही विठ्ठलरूप भक्तीची गंगा पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप झाली आहे, ती वारी-दिंडीच्या रूपात. वारी सोहळा हा केवळ आध्यात्मिक सुखाचा प्रवाह नसून, ती राष्ट्रीय एकात्मतेची गंगोत्री आहे. खांद्यावरील भगवी पताका हे त्या एकात्मतेचे महान प्रतीक...